साहित्य : 2 वाटी बारीक कापलेली गाजर, 3 कप संत्र्याचा रस, 4 लहान चमचे लोणी, अर्धा वाटी कापलेले कांदे, अर्धा चमचा पांढरी मिरची पावडर, दोन चमचे साखर, 1/2 कप क्रीम, थोडी कोथिंबीर व मीठ चवीनुसार.
कृती : कढाईत थोडे लोणी गरम करून त्यात कापलेली गाजर टाकावे व क्रीम सोडून सर्व साहित्य त्यात मिसळून गाजर नरम होईपर्यंत शिजवावे. त्यानंतर थंड करून मिक्सरमधून काढून त्याचे पेस्ट तयार करावी. त्याला चाळणीतून गाळून घ्यावे. गाळलेले सूप परत गरम करावे, एक मोठा चमचा क्रीम वेगळे काढून घ्यावे व उरलेले क्रीम त्यात टाकून एकजीव करावे. गरमा गरम सूप काचेच्या लहान कटोर्यात सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा