साहित्य : हिरवे वाळलेले मूग 250 ग्रॅम, पाणी 4 कप, 2-3 पाकळ्या लसूण, 1 लहान कांदा, लोणी 2 चमचे, 1 मोठा टोमॅटो, आले, जिरेपूड, चवीला साखर, मिरेपूड.
कृती : प्रथम मूग रात्री भिजत टाकून सकाळी स्वच्छ धुवावेत व चांगले शिजवून मिक्सरमध्ये बारीक वाटावेत. कांदा बारीक करून लसूण, कांदा, आले, जिरेपूड बारीक वाटून पेस्ट करावी. ही पेस्ट पातेल्यात थोडे लोणी तापवून, विरघळल्यावर त्यात परतावी. त्यात टोमॅटोच्या फोडी टाकून सर्व एकजीव परतावे. मैदा थोड्या पाण्यात गोळी होऊ न देता चोपडा कालवावा. परतलेल्या टोमॅटोला तेल सुटून खमंग झाले की वरील सर्व मिश्रण (मूग, मैदा) त्यात टाकून मीठ, साखर, मिरेपूड सर्व एकत्र करून गरम करा. एका काचेच्या बाऊलमध्ये काढा व सर्व्ह करा.