Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दसर्‍याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्यामागील शास्त्र काय ?

सौ. अंजली गाडगीळ

दसर्‍याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्यामागील शास्त्र काय ?
WD
दसरा हा सण जिवांत क्षात्रभावाचे संवर्धन करतो. शस्त्रांची पूजा ही जिवांत प्रत्यक्ष क्षात्रतेज कार्यरत करण्याचे प्रतीकात्मक रूप आहे. कोणत्याही देवतेच्या हातात असणारे शस्त्र हे दुर्जनांचा विनाशकाल दर्शवून साधकांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असते. या दिवशी शस्त्रांची पूजा करून देवतांच्या मारक शक्‍तीला आवाहन करून स्वत:त वायुमंडलात वेगाने तळपत असणार्‍या शस्त्राच्या धारेप्रमाणे क्षात्रतेजाची निर्मिती करून घ्यावयाची असते.

दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात असणार्‍या श्रीराम व हनुमान या तत्त्वांच्या लहरींच्या आधिक्यामुळे त्या त्या तत्त्वांचे शस्त्ररूपी प्रतीकात क्षात्रतेजाच्या आधारे संवर्धन होऊन त्यातून शस्त्राच्या अग्रभागातून वेगाने कारंजाप्रमाणे वायुमंडलात प्रक्षेपण होते. क्षात्रतेजाच्या प्रक्षेपणामुळे जिवांत क्षात्रभाव निर्माण होऊन प्रत्यक्ष मायेतील कर्म करण्यास गती प्राप्‍त होऊन येणार्‍या प्रत्येक अडथळयांवर सूर्यनाडीच्या आधारे मात करणे शक्य होते; म्हणून दसर्‍याच्या दिवशी वायुमंडलातील तेजरूपी क्षात्रलहरींना पूरक अशा प्रतीकाचे, म्हणजेच शस्त्रांचे पूजन करणे हितावह ठरते.

Share this Story:

Follow Webdunia marathi