आपल्या सनातन धर्मात विजयादशमीच्या सणाला फार महत्त्वाचे स्थान आहे. विजयादशमीच्या दिवशीच मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीरामाने अत्याचारी लंकाधिपती रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवली.
विजया दशमीचा सण असत्यावर सत्येची विजय मिळविण्याचा सण आहे. विजयादशमी सणाच्या निमित्त युद्धामध्ये वापरली जाणारी सर्व साधने आणि अस्त्र-शस्त्रांची पूजा केली जाते. देशातील काही भागात विजयादशमीच्या दिवशी अश्वांची पूजा देखील करतात.
शास्त्रानुसार विजयादशमीच्या दिवशी शमी-पूजनाचे विशेष महत्त्व आहे. दरवर्षी विजयादशमीचा सण अश्विन शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला साजरा केला जातो.
या दिवशी दशमी तिथीत संध्याकाळी तारा उदित होण्याच्या वेळी 'विजयकाळ' असतो. शास्त्रानुसार 'विजयकाळात' शमी-पूजन आणि शस्त्र-पूजन केल्यानं सर्व कार्य सिद्ध होतात.
वर्ष 2020 मध्ये काही मतांतर असल्यामुळे पंचांगात विजयादशमी तिथी 25 ऑक्टोबर आणि 26 ऑक्टोबर या दोन दिवशी सांगितली जात आहे. आता भाविकांपुढे हा एक मोठा प्रश्न उद्भवत आहे की त्यांनी विजयादशमीचा सण कधी साजरा करावा.
ज्या सणांमध्ये रात्रीच्या पूजेचे महत्त्व असते त्या सणामध्ये चंद्राने बघितलेली तिथी मान्य केली जाते. विजयादशमीची पूजा शास्त्रानुसार 'विजयकाळात' करतात आणि 'विजयकाळ' संध्याकाळच्या दशमी तिथीमध्ये तारा उदय झाल्यावर होतो.
या वर्षी 25 ऑक्टोबर 2020 ला दशमी तिथी सकाळी 7:41 पासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी 9:00 वाजे पर्यंत असणार, तर 26 ऑक्टोबर 2020 रोजी संध्याकाळी 'विजयकाळ' एकादशी तिथी मध्ये असणार जी दुसऱ्या दिवशी 10:46 वाजे पर्यंत असणार.
म्हणून, विजयादशमीच्या निर्धारित असलेल्या शास्त्रानुसार संध्याकाळी 'विजयकाळात' दशमी तिथी असणं बंधनकारक आहे. जी 25 ऑक्टोबर 2020 रोजी आहे. या शास्त्रीय आधाराला लक्षात घेऊन विजयादशमी चा सण 25 ऑक्टोबर 2020 रोजी साजरा केला जाणार आहे.