दुष्टांवर विजय प्राप्त करण्यासाठी नियतीने आपल्याला एक संधी दिली आहे. दुष्टांविरुध्द कंबर कसून लढण्याची ही योग्य वेळ आहे. दसरा हे त्याचे निमित्त. विजयादशमीच्या मुहूर्तावर दुष्टांचे प्रतीक असलेल्या रावणाचा वध करण्याची संधी आम्ही तुम्हाला देऊ केली आहे.
कसे खेळावे? प्रभू रामचंद्रांजवळ त्यांचे धनुष्य आहे आणि हातात बाण आहे. समोर राक्षससेना उभी आहे. त्या दुष्टांना ठार करण्यासाठी आपण प्रभू रामचंद्रांना साथ देऊ शकता. राक्षसांना ठार मारण्यासाठी आपण बाण सोडू शकता. शेवटी, आपल्याला राक्षसांच्या राजाला म्हणजे रावणाला तोंड द्यावे लागेल. राक्षसांच्या राजाला ठार मारण्यासाठी त्याच्या पोटाच्या बेंबीवर तीन वेळा बाण मारा. पण, सावधान, जर आपण रावणाला 60 सेकंदात ठार मारू न शकल्यास आपला गेम संपेल. चला, मग वेळ कशाला घालवताय. सुरू करा.