चंद्र ग्रहण : तूळ राशीवर नाही पडणार ग्रहणाचा प्रभाव

मंगळवार, 16 जुलै 2019 (09:59 IST)
आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्ष गुरु पौर्णिमाच्या प्रसंगी मंगळवारी रात्री चंद्र ग्रहण लागणार आहे. चंद्र ग्रहण रात्री 1.30 मिनिटाने सुरू होऊन बुधवारी सकाळी 4.30 वाजता संपणार आहे.   
 
गुरु पौर्णिमेच्या मध्यरात्री किमान दीड वाजता चंद्र ग्रहण लागेल. चंद्र ग्रहणच्या 9 तास आधी वेध लागतील, ज्यामुळे सिद्धपीठ मंदिरांचे कपाट वेध लागण्याच्या आधी बंद होतील आणि त्यानंतर शुभ कार्य संपन्न होणार नाही. यासाठी भक्तांनी गुरू पौर्णिमेशी संबंधित गुरु पूजन इत्यादी शुभकार्य वेध लागण्याअगोदर करून घ्यावे.  
 
ग्रहण भारताच्या विभिन्न भागांमध्ये बघायला मिळेल, जेव्हा की ग्रहणाचे मोक्ष बुधवारच्या सकाळी 4.30 वाजता होईल. त्यांनी भक्तांना चंद्र ग्रहणाच्या दरम्यान जप, तप करणे आणि मोक्षानंतर दान-पुण्य करण्याचे आव्हान केले आहे.  
 
इतर राशींवर पडेल प्रभाव  
ग्रहणाच्या वेळेस राहू आणि चंद्र शनीसोबत धनू राशीत राहणार आहे, ज्यामुळे ग्रहण जास्त प्रभावशाली असेल, जेव्हा की राहू आणि शुक्र सूर्यासोबत राहतील. त्याशिवाय  सूर्य आणि चंद्र चार विपरीत ग्रह शुक्र, शनी राहू आणि केतूच्या घरात असतील.  
 
ग्रहणाच्या दरम्यान ग्रहांची स्थिती प्रभावित व्यक्तीच्या मनात तणाव निर्माण करेल. ग्रहणाचा प्रभाव मेष, मिथुन, सिंह, कन्या, वृश्चिक, धनू आणि मकर राशीत असेल व बाकी सर्व राशीच्या लोकांनी ग्रहणकाळात सावधगिरी बाळगावी. पण तूळ राशीवर ग्रहणाचा प्रभाव पडणार नाही. चंद्र ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये व गर्भवती महिलांनी चंद्र ग्रहण न बघता पूजा पाठ करावे.  

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख साप्ताहिक राशीफल 14 ते 20 जुलै 2019