हिंदू पंचांगानुसार, फाल्गुन पौर्णिमेला होळीचा सण साजरा करतात. यंदा होळी 25 मार्च ला साजरी केली जाणार आहे. या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण देखील असणार. ज्योतिषशास्त्रानुसार हे चंद्रग्रहण होळीच्या दिवशी तब्बल 100 वर्षानंतर होणार आहे. या चंद्रग्रहणाचा प्रभाव या राशींवर दिसून येणार आहे. ज्यांचे नशीब चमकू शकते. चला जाणून घेऊया चंद्रग्रहणामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो.
मेष
या राशीच्या लोकांना होळीच्या दिवशी लागणाऱ्या या ग्रहणाचा चांगला प्रभाव मिळेल. या राशीच्या जातकांना प्रगतीचे मार्ग दिसून येईल. या राशीच्या जातकांना धनलाभ होऊ शकतो. या राशीच्या जातकाची अडकलेली धन संपत्ती परत मिळेल, संपत्तीमध्ये वृद्धी होईल.
वृषभ
होळीच्या दिवशी पडणाऱ्या चंद्रग्रहणाचा वृषभ राशीच्या लोकांवर सर्वाधिक शुभ प्रभाव पडतो. या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले तुमचे पैसे परत मिळू शकतात. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होऊ शकते. योजना यशस्वी होतील आणि समाजात मान-सन्मान वाढेल.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण शुभ राहील. तुम्हाला आर्थिक लाभ आणि भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. व्यवसाय करणारे लोक चांगले डील मिळविण्यात यशस्वी होतील आणि चांगला नफा कमावतील. तुमची जवळजवळ प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला नशीब मिळेल. धार्मिक कार्यात तुम्हाला रस राहील. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळतील. आर्थिक वृद्द्धी होईल.
मकर
मकर राशीच्या जातकांसाठी चंद्रग्रहण चांगले परिणाम देईल. अचानक आर्थिक लाभाची संधी मिळेल. तुमचा आत्मविश्वास लक्षणीय वाढेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात नफा मिळू शकतो आणि कोणतीही नवीन योजना आकार घेऊ शकते. नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी प्रगती आणि आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील. भौतिक सुखसोयी वाढतील. तुम्हाला रिअल इस्टेटचा कोणताही व्यवहार करायचा असेल त्यासाठी वेळ तुमच्यासाठी अनुकूल असेल.
कुंभ
या राशीच्या जातकांसाठी हे चंद्रग्रहण चांगले दिवस घेऊन येणार आहे. या राशीच्या जातकांना नौकरीच्या नवीन संधी मिळतील. या राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल होईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात फायदा होईल. घरात काही शुभ कार्ये घडतील. करिअरमध्ये प्रगती होईल.
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयावर सल्ला घ्या.