आज मंगळवारी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आहे. संपूर्ण भारतातून हे पाहता येणार आहे. आज दिसणारे हे खंडग्रास चंद्रग्रहण आहे. हे चंद्रगहण जवळपास तीन तासांचे आहे. मंगळवारी रात्री 1 वाजून 32 मिनिटांचे आहे. मंगळवारी रात्री 1 वाजून 32 मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होईल आणि पहाटे 4 वाजून 30 मिनिटांनी संपणार आहे. भारतासोबतच अफगाणिस्तान, युरोप, तुर्की, इराण, इराक, सौदी अरब, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि अंटार्टिका येथे दिसणार आहे. शास्त्रांनुसार चंद्रग्रहणाचं वेध नऊ तास आधी सुरू होतात. त्यानुसार चंद्रग्रहणाचे वेध सुरू होण्याची वेळ मंगळवारी 16 जुलसला 8 वाजून 40 मिनिटांनी असेल. हे चंद्रग्रहण बुधवारी 01:31 वाजे पासून सुरू होऊन 04:29 वाजेपर्यंत राहणार आहे. भारतात आता पुढचे चंद्रग्रहण 26 मे 2021 दिसणार आहे.
यंदा चंद्रग्रहण संपूर्ण देशात कुठून ही बघता येईल. रात्री असल्यामुळे याला बघणे सोपे जाईल, पण वादळ असल्यास हे बघणे शक्य होणार नाही. फक्त पौर्णिमेच्या दिवशीच चंद्रग्रहण असत.
पूर्णपणे सुरक्षित
चंद्रग्रहणाला नग्न डोळ्याने बघणे देखील पूर्णपणे सुरक्षित आहे. याला बघण्यासाठी दूरबीनची आवश्यकता नाही आहे. पण दूरबीनने याला अधिक चांगल्या पद्धतीने बघू शकतो.