या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या लेखासंदर्भात वाचक आपली मते वाचकांची पत्रे या माध्यमातून व्यक्त करू शकतात. तसेच आपल्या सूचनाही आम्हाला कळवू शकता. आपल्या मनातील विचारांना मुक्तपणे मांडण्याचे हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर आपले सहर्ष स्वागत.... संपादक
महाराष्ट्रातील 70 आमदारांची पोहोच दहावीपर्यंतच-
ही बातमी छान. या बातमीसाठी वरचा अभ्यास करावा लागला असे दिसते. अशाच बातम्या देत रहा. -आशुतोष दीक्षित ( [email protected])
- जे लोक मतदान करीत नाहीत त्यांना शरम वाटली पाहिजे. आता शिक्षित लोकांसाठी नव्वद टक्के आरक्षण पाहिजे. - राजीव रत्नालीकर ( [email protected])
- सार्वजनिक क्षेत्रात अडाणी लोकप्रतिनिधींची संख्या एवढी प्रचंड असेल तर ते धक्कादायक आहे. गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या समस्या विधीमंडळात मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी शिक्षीतच असायला हवा. अशिक्षीत आमदारांमुळे विधीमंडळाचे कामकाज कसे चालते, त्यावर वेगळे काही लिहायची गरज नाही. खरेतर, अशा अडाणी आमदारांना निवडणुकीलाही उभे राहता येण्यास बंदी आणायला हवी. किमान पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास निवडणुकीची संधी द्यायला हवी. अन्यथा असे अडाणी आमदार कुचकामी ठरतील. - तुषार खरात ([email protected] )
- याप्रकारेच देशातील केंद्रीय राजकीय नेत्यांची जनतेला महिती द्यावी - सुशील( [email protected] )
-अशाच बातम्या वाचायला आवडतात. शोधून काढलेल्या बातम्या आहेत. अशाच नेहमी द्या. आभारी आहोत. - राजेश सावंत ([email protected] )
आता करा ऑनलाईन श्रीगणेश पूजा- यात मराठी आरती हवी होती. - जितेंद्र कुलकर्णी ([email protected]) ( आपल्या सूचनेची दखल घेऊन तेथे मराठी आरती देण्यात आली आहे. सूचनेबद्दल धन्यवाद. - संपादक)
'ऐश्वर्यासही' असूया- फार सुंदर लेख आहे. - स्वाती परब ( [email protected])
परमतत्व गणेश- हा लेख छान आहे. गणपतीसहस्त्रनाम लिहून पाहिजे आहे. धन्यवाद. - अपर्णा हुद्दार ( [email protected])
परमतत्व गणेश- मला हा लेख आवडला - सुरेश कुलकर्णी ( sumakul @rediffmall.com )
श्रीगणेशाची छायाचित्रे पाठवा. - छान कल्पना - सुमा कुलकर्णी
आता करा ऑनलाईन श्रीगणेश पूजा- छान वाटले. - प्रशांत कवी ( [email protected] )
गणपती विसर्जन पूजा हा लेख आज गणपती विसर्जन पूजा करण्यासाठी अप्रतिम वाटला. - राम देशपांडे ([email protected] )
- आपली वेबसाईट छान आहे. फक्त शुद्धलेखनाकडे लक्ष द्या. वेबसाईटला भविष्य उत्तम आहे यात काही शंका नाही. - सदानंद कदाम ( [email protected] )
आली गौराई अंगणी- हा लेख फार चांगला वाटला - राजेंद्र प्रभाकर खासपास (27000333@echoupal.com)
श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील जबलपूरच्या बाबाचा लेख आवडला. मुंबईतील गोरेगाव (पश्चिम) येथे असे प्रकार बरेचदा घडतात. -राज ( [email protected] )
इतर धर्मातही गणेश उपासना- छान लेख आहे. मी तर हे पेज पण बुकमार्क केले. - तुषार गाडीकर ( [email protected] )
कर्णधारपद सोडण्याचा राहूल द्रविडचा निर्णय- त्याने हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. पण तरीही हा निर्णय स्वागताहर्यच आहे. कारण त्यामुळे आता तो त्याचा नैसर्गिक खेळ खेळू शकेल. त्याला त्याच्या पुढील कारकिर्दीबद्दल हार्दीक शुभेच्छा. -अक्षय ( [email protected] )
- रामसेतु या मुद्द्यावर सर्व हिंदूंची मागणी आहे की सर्व संबंधिताना खुलेआम फाशी द्यावी!! टु बी हेंग्ड टिल डेथ !! - एस. प्रकाश ( [email protected] )
पोलिस दलाला रामराम, खासगी नोकरीला सलाम-सिंह,पांडे,मकवाना हे सर्व पैसे कमविन्या साठी महाराष्ट्रा मधे आले आहेत ते डरपोक आहेत म्हणून पोलिस सेवा सोडली. त्याने काही फरक पडत नाही. सावंत, पाटिल, जाधव, कदम, शिंदे, इनाम्दार, राणे इत्यादी मर्द मराठे आहेत ना? जय महाराष्ट्र. - जगताप ( [email protected] )
ध्यान- एक मनोदैहिक प्रक्रिया- आवडला. माहितीपूर्म लेख - अनंत कुलकर्णी ( [email protected] )
भगवदगीतेसंदर्भातील उल्लेखाने वाद-I welcome the statement of Hon'ble judge. He should be congratulated for such a heart felt statement. GEETA is a world heritage and incomparable holy book of its kind. - अंशुमन दळवी ( [email protected] )
भगवदगीतेसंदर्भातील उल्लेखाने वाद-गीतेतील तत्वांचे पालन करणे एवढेच न्यायाधीशांना अपेक्षित असावे. याचा अर्थ धार्मिक अंगाने घ्यावा असे नाही. त्यामुळे उगाचच या विधानावर गहजब माजविण्याची गरज नाही. - मंजूषा खेडकर ( [email protected])
-निष्कारण वाद. आता राजकारण्यांना हाती कोलित मिळाले. न्यायाधीशांनी तरी आपली वैयक्तिक मते न्यायदानात देऊ नये. - डॉ. बाळकृष्ण शेलार ( [email protected])
स्थापत्य वेद- वास्तूविषयी सर्व काही- स्थापत्यवेदाचे पुस्तक आहे का? ते कुठे मिळू शकेल? - अमृता देव ( [email protected] )
चक दे इंडिया....पण हॉकीत-हॉकी वरील लेख खूपच छान वाटला.मेजर ध्यानचंदांच्या कालखंडापासून आतापर्यंतच्या भारतीय हॉकी मधील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा लेखकाने वेचक शब्दात घेतला आहे. - राजश्री वावगे ( [email protected])
अजून उजाडत नाही....-हल्ल्यानंतर अमेरिकेने जे तांडव अफगाणिस्तान, इराकमध्ये घातले ते त्यांनाच त्रासदायक ठरणार आहे. दुर्देवाने हे बुश यांच्या लक्षात येत नाहीये. किंवा आले तरी त्यांना हे सोंग वठवावे लागत आहे. त्यामुळे हे प्रभो येशू त्यांना वाचव. ते काय करत आहेत. हे त्यांनाच कळत नाही. - मंदार जोशी (: [email protected] )
प्राणीपक्षांच्या सानिध्यात मुक्त भटकंती...छान माहिती. जायची उत्सुकता निर्माण झाली. - विठ्ठल कस्तुरे ( [email protected] )
हंस अकेला - पंडित कुमार गंधर्व-कुमारजींविषयी अतिशय छान माहिती मिळाली. हे उत्तुंग व्यक्तिमत्व लघुपटात पकडणे खरोखरच अवघड. पण हा चित्रपट कुठे बघायला मिळेल? - भाग्यश्री जोगळेकर ( [email protected] )