या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या लेखासंदर्भात वाचक आपली मते वाचकांची पत्रे या माध्यमातून व्यक्त करू शकतात. तसेच आपल्या सूचनाही आम्हाला कळवू शकता. आपल्या मनातील विचारांना मुक्तपणे मांडण्याचे हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर आपले सहर्ष स्वागत.... संपादक
सौंदर्य खुलविणारा नारळ हा लेख खरोखरच चांगला वाटला. यातील माहिती फार उपयुक्त आहे.
आपण इतके असंवेदनशील झालो? या लेखाबद्दल धन्यवाद. अलिकडे मिडीया शब्द इलेक्ट्रॉनिक माध्यमांबाबत प्रामुख्याने वापरला जात असला तरी शहीद जवानांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यात इलेक्ट्रॉनिक्सप्रमाणे प्रिंट मिडीयानेही कोतेपणा दाखवला आहे. माध्यमांचे दुर्लक्ष झाले असले तरी सामान्य माणसांचे काय? त्यांचीही तीच परिस्थिती आहे. आतापर्यंतच्या शहीदांच्या कुटुंबियांचे अनुभव पहा. तरीही या असंवेदनशीलतेची जाणीव करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
आपण इतके असंवेदनशील झालो? हा अतिशय छान लेख होता. यातून लोकांचा अशा घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोन कळतो. संजय दत्तला येरवाडा तुरूंगात हलवले जात असताना एका सबसे तेज चॅनेलने त्याची क्लिपिंग्ज तब्बल तीन ते चार तास दाखवून लोकांना छळले.
गांधीगिरीपूर्वीचा खलनायक हा लेख सुंदर. ह्या प्रकारचे लेख सतत लिहित जावे. हाच लेख निदान ४ दिवस अगोदर वाचायला मिळायला हवा होता. लोकमान्य उक्ती (टिळक पुण्यतिथी विशेष) हे संकलनही सुंदर.
कुणीतरी आवाज बुलंद करा हा लेख वाचला तुम्ही लोकाना जागृत करताहेत याबद्दल अभिनंदन. माननीय किरण बेदी याना सर्वसामान्य जनतेने पाठिंबा द्यायलाच हवा. या लोकशाहीत अशा प्रामाणिक अधिकार्यांची जास्त गरज आहे. तरच हे मतलबी राजकारणी दबून राहतील. नाही तर मुठभर लोकांची करोडोची माया आणि सर्वसामान्यांचे जीवन गेले वाया अशी अवस्था व्हायची.
मुंबईत जीव का जाईना आपल्याला हवी शिवसेना मराठी अस्मितेची कास शिवसेनेने सोडली असली तरी मला वाटते की शिवसेनेची काळानुरूप भूमिका योग्य आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंची हा लेख माहितीपूर्ण आहे.
साहित्य विभागात भरगच्च मजकूराने आणि माहितीपूर्ण लेखांनी परिपूर्ण आहे. लिखाणाची शैली छान आहे. मला वैयक्तिकरित्या विश्वास पाटील व व्यंकटेश माडगूळकर यांच्यावरील लेख आवडले.
माडगूळकरांनी तर माणसं, भोवतालचा परिसर, संस्कृती आपल्या लेखनातून चितारलीच. त्यामुळे माणसं चितारणारा लेखक हे शीर्षक अगदी समर्पक आहे.मात्र एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, की तुमच्या लेखकाने माडगूळकरांचे चरित्र अगदी छान रेखाटले आहे.
`मी` पण गळून जाण्याचा सोहळाः पंढरीची वारी हा लेख खूप चांगला आणि संस्कारी आहे. ज्यामुळे आपल्या येणार्या पिढीला वारीचे महत्त्व आणि विठूचे माहत्म्य समजेल.