Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 28 March 2025
webdunia

कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटकांवर मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटकांवर मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
, रविवार, 16 फेब्रुवारी 2025 (15:19 IST)
शनिवारी सकाळी कर्नाळा पक्षी अभयारण्यात मधमाश्यांच्या थव्याने पर्यटकांवर हल्ला केल्याने एका44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. मृताचे नाव संदीप पुरोहित असे आहे. तो कोपरखैरणे येथील आहे. ते  शनिवारी सकाळी त्याची पत्नी, मुलगा आणि कुटुंबातील मित्रांसह कर्नाळा किल्ल्याची सहल करण्यासाठी अभयारण्यात आले होते .मधमाशांच्या हल्ल्यात संदीप यांची पत्नी चारुपुरोहित आणि लक्ष पुरोहित जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर संदीप यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. 
सकाळी 11 वाजेच्या सुमारास वन अधिकाऱ्यांना या हल्ल्याची माहिती देण्यात आली नंतर अधिकारी आणि बचाव पथकाने पर्यटकांना वाचवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली.त्यांना पर्यटक जमिनीवर पडलेले आढळले. 
हे सर्व पर्यटक कर्नाळा किल्ल्याकडे जात असतांना अभ्यरण्यातून वाट काढताना अचानक मधमाश्यांच्या थ्वयाने त्यांच्यावर हल्ला केला. स्वता:ला वाचविण्यासाठी पर्यटकांमध्ये पळापळ झाली.
ALSO READ: मुंबई प्रमाणे रामटेकमध्येही फिल्म सिटी बांधणार, राज्य सरकारने दिली मंजुरी
या पर्यटकांमध्ये एक पर्यटक बेशुद्ध झाला त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर असलेले कर्नाळा अभ्यारण्य हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असून शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते. शनिवारी देखील माटुंगातील एका महाविद्यालयातील काही मुले ट्रेकिंगसाठी आली असता त्यांच्यावर देखील मधमाश्यांच्या थ्वयाने हल्ला केला. या मध्ये तिघे जखमी झाले. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाळ दूध पीत नाही, नैराश्यात येऊन आईने घेतले टोकाचे पाउल, नागपुरातील घटना