Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 6 April 2025
webdunia

कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज?; फडणवीसांचा प्रतिसवाल

Who says Munde Bhagini is upset ?; Response of Fadnavis Maharashtra newa regional marathi news webdunia marathi
, शुक्रवार, 9 जुलै 2021 (09:35 IST)
केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांचा समावेश न झाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा आहे, या पत्रकारांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच भडकले. कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज आहेत. तुम्हाला कुणी सांगितलं? असा सवाल करतानाच उगाच काहीही बदनामी करू नका, असं फडणवीस म्हणाले.
 
फडणवीस नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने प्रीतम यांच्यासह पंकजा मुंडेही नाराज असल्याची चर्चा आहे, असं फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावर फडणवीस भडकले. तुम्हाला कोणी सांगितलं त्या नाराज आहेत. कृपा करून कारण नसतान त्यांना बदनाम करू नका. भाजपमध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेते घेतात. योग्यवेळी निर्णय होत असतात. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचं सांगून त्यांची अकारण बदनामी करू नका, असं फडणवीस म्हणाले. नाराज नाही तर मग मुंडे भगिनींनी ट्विट का केलं नाही?, असा सवालही फडणवीसांना करण्यात आला. या प्रश्नावर फडणवीस काहीसे भडकले. योग्यवेळी निर्णय होत असतात. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचं सांगून त्यांची अकारण बदनामी करू नका, असं फडणवीस म्हणाले.
 
मी ईडीचा प्रवक्ता नाही
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबत जे काही बोलायचं ते ईडी बोलेल. मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. कायदा आपलं काम करत असतो. भाजपमध्ये अशाप्रकारे सुडाने काम करण्याची प्रथा नाही, असं फडणवीस म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुबंईत आज लसीकरण बंद राहणार