राजस्थानमध्ये पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, राज्यपाल एस के सिंह यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
पाच राज्यांच्या झालेल्या निवडणुकांमध्ये राजस्थानात मतदारांनी कॉग्रेसला बहुमत दिले आहे. यापूर्वी राजस्थानात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर होते. आता भाजपचा या निवडणुकांमध्ये धुव्वा उडाल्यानंतर काल मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.