Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सत्तेच्या सेमीफायनलमध्ये कॉंग्रेस वरचढ

सत्तेच्या सेमीफायनलमध्ये कॉंग्रेस वरचढ

भाषा

, सोमवार, 8 डिसेंबर 2008 (14:52 IST)
लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने दमदार कामगिरी करताना तीन राज्यांची सत्ता आपल्याकडे खेचली आहे, तर भाजपला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील सत्ता राखण्यात तेवढे यश आले आहे.

कॉंग्रेसने राजस्थानमधील 'वसुंधराराज' संपवले आहे, तर दिल्लीत शीला दीक्षितांनी विजयाची हॅटट्रिक चालवली आहे. मिझोराममध्येही कॉंग्रेसने सत्तारूढ मिझो नॅशनल फ्रंटला मात देत सत्ता प्राप्त केली आहे.

दोनशे सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत कॉंग्रेस ताज्या आकडेवारीनुसार ९१ जागी आघाडीवर आहे. तर भाजप ७९ जागांवर आघाडीवर आहे. २८ जागांवर अपक्ष व इतर छोट्या पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत.

'मध्य प्रदेशात एकही आवाज, फिर भाजपा फिर शिवराज' ही घोषणा फळली आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दुसर्‍यांदा राज्यात सत्ता मिळविण्याच्या दिशेने आगेकूच चालवली आहे. २३० सदस्यांच्या विधानसभेत भाजप १२० जागांवर आघाडी मिळवून आहे, तर कॉंग्रेस ९१ जागी आघाडीवर आहे. ३० जागांवर अपक्ष व इतर पक्षांचे उमेदवार पुढे आहेत.

छत्तीसगडमध्ये भाजपने ५४ जागी आघाडी घेतली आहे. कॉंग्रेस ३२ जागांवर पुढे आहे. सुरवातीला या दोन पक्षांत जबरदस्त चुरस दिसून येत होती. पण अखेरीस भाजपने निर्णायक आघाडी घेतली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi