Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ख्रिस्ती बांधवांचा मोठा सण 'नाताळ'

webdunia
, रविवार, 25 डिसेंबर 2022 (07:54 IST)
नाताळ हा ख्रिस्ती बांधवांचा मोठा सण आहे. दरवर्षी संपूर्ण जगात हा सण 25 डिसेंबर रोजी दणक्यात साजरा करण्यात येतो. ख्रिस्ती बांधवांचे देव येशू यांचा जन्मोत्सव म्हणून हा सण 25 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यंत साजरा केला जातो. त्यांचे आराध्य देव येशूच्या जन्म याच दिवशी झाला असे. यांनीच ख्रिस्ती धर्माची सुरुवात केली होती. 
 
दरवर्षी हिवाळ्यात हा सण साजरा करतात. 25 डिसेंबर साठी घराघरात जवळपास एका आठवड्यापूर्वीच जय्यत तयारी सुरू होते. लोक आपल्या घराची स्वच्छता करतात. घराला रंगवतात, घराला सजवतात, नवीन वस्तू, कपडे, मिठाई, एकमेकांना देण्यासाठीच्या भेटवस्तू आणतात. चर्च सजवतात. घराघरात ख्रिसमसचे झाड लावून त्यावर रोषणाई करून त्याला फुगे, खेळणी, चॉकलेट, चित्र, फुलांनी सजवतात. लोक एकमेकांकडे जाऊन हा सण साजरा करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. 
 
मुलांचा लाडका सांताक्लाज मुलांना खेळणी, खाऊ देतो अशी आख्यायिका आहे. लाडक्या येशूच्या जीवनावर नाटक सादर करतात. ख्रिसमसच्या आदल्या रात्री चर्च मध्ये प्रार्थना सभा करतात जे रात्री 12 वाजे पर्यंत चालतात. मेणबत्त्या पेटवतात. घराघरात एक उत्साही आणि आनंदी वातावरण असतं. हा सण सगळे ख्रिस्ती बांधव मिळून दणक्यात साजरा करतात. मग तो श्रीमंत असो किंवा गरीब. आपापल्या परीने एकमेकांना भेटवस्तू देतात आणि शुभेच्छा दिल्या जातात. 
 
घरा-घरात नवीन खाद्य पदार्थ बनतात. बाजारपेठ सुद्धा रोषणाईने झगमगतात. सर्वत्र आनंदी वातावरण असतं. मुलं तर या सणाची आणि विशेष करून मिळणाऱ्या भेटवस्तूची अगदी आतुरतेने वाट बघतात. या सणासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधान देखील आपल्या देशातील ख्रिस्ती बांधवाना शुभेच्छा देतात. हा सण आपल्याला सेवा, त्याग आणि क्षमाशीलतेचा संदेश देतो आणि येशू ख्रिस्ताच्या महानतेची आठवण करून देतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Paneer Pasanda Recipe : रेस्टॉरंट स्टाईल पनीर पसंदा रेसिपी