Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निबंध भारतीय क्रांतिकारक भगत सिंग

निबंध  भारतीय क्रांतिकारक भगत सिंग
, बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (09:20 IST)
भारतीय क्रांतिकारक भगत सिंह भारताचे एक महान क्रांतिकारक होते. ह्यांचा जन्म 28 सप्टेंबर1907 रोजी पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बँगा गावात झाला होता. त्यांच्या आईचे नाव विद्यावती आणि वडिलांचे नाव किशन सिंग होते. त्यांच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले होते. भगतसिंग यांना हिंदी, उर्दू,पंजाबी,आणि इंग्रजी भाषेच्या व्यतिरिक्त बंगला देखील येत होती. वयाच्या 14 व्या वर्षीच ते  गुरुद्वारात नानकासाहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्याच्या विरोधातच्या आंदोलनात सहभागी झाले. नंतर ते युवा क्रांतिकारी चळवळीत सामील झाले, आणि ब्रिटिश सरकारच्या हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठी विचाराचे समर्थक झाले. इटलीच्या एका गटा पासून प्रेरित होऊन भगतसिंगने मार्च 1926 मध्ये 'नवजवान भारत सभा' स्थापन केली. नंतर ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक संघाचे सदस्य देखील झाले. या संघात त्यांच्या सह चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल,शाहिद,अशफाखाल्ला खान सारखे दिग्गज होते.

डिसेंबर 1928 मध्ये, भगतसिंग आणि त्यांचे सहकारी शिवराम राजगुरू यांनी ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सॉंडर्स ला लाहोर येथे गोळ्या घालून ठार केले. ब्रिटिश पोलीस अधीक्षक जेम्स कॉटच्या आदेशावरून लाला लाजपतराय यांच्या वर लाठीचार्ज करून जबर जखमी केले. त्या मुळे लाला लाजपतराय यांना आपले प्राण गमवावे लागले .लाला लाजपत राय ह्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी  जेम्स कॉटला ठार मारायचे ठरविले होते परंतु एन वेळी सॉंडर्स पुढे आल्यामुळे तो ठार झाला. या नंतर त्यांनी देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून स्वातंत्र्य करण्यासाठी साहसाने ब्रिटिश सरकारचा सामना केला त्यांनी  दिल्लीच्या सेंट्रल असेंब्ली मध्ये  बॉम्ब हल्ला करून  ब्रिटिश साम्राज्याच्या विरुद्ध उघड बंड केले. त्यांनी सेंट्रल असेंब्ली मध्ये बॉम्ब टाकून पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला नाही. त्यासाठी त्यांना आणि त्यांच्या सह त्यांचे दोन सहकारी राजगुरू आणि सुखदेव यांना  23 मार्च 1931 रोजी फाशावर देण्यात आले.त्यावेळी त्यांचे वय अवघ्या 23 वर्षाचे होते. त्यांच्या त्यागाला संपूर्ण देश आजतायगत स्मरत आहे.  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अष्टमी प्रसाद : शिरा पुरी