नागपूरच्या गांधीनगर भागातील महाराष्ट्र अध्ययन मंदिराला मोठी परंपरा आहे. पुढच्या वर्षे या शाळेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. श्री. देवताळे यांनी 1959 रोजी या शाळेची स्थापना केली.
सुरवातील पहिली ते दहावीचे वर्ग होते. गोरगरीब वस्तींतील विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण देणे हे शाळेचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच दर शनिवारी आणि शुक्रवारी साने गुरुजी कथामाला भरते. त्यात सर्वधर्मसमभाव प्रार्थना केली जाते. या शाळेची शैक्षणिक प्रगतीही उत्कृष्ट आहे. पश्चिम विभागात उत्कृष्ट शाळा असा तिचा नावलौकीक आहे. दहावीत यावर्षी शाळेचा निकाल 97 टक्के लागला. शाळेच्या मुख्याध्यापिका एस. ओ. कटकवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची उज्ज्वल वाटचाल सुरू आहे. शाळेत सध्या 30 शिक्षक असून, तिच्या गोपालनगर, महाराष्ट्र अध्ययन गणेश पेठ, विद्यालय राजाबाग, मेडीकल चौक आदी भागात शाखा आहेत. गांधीनगर शाखा मुख्य आहे.
वेबदुनिया या पोर्टलच्या प्रचाराचा कार्यक्रम शाळेत झाला. याविषयी बोलताना शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. व्ही. आर देवतळे यांनी वेबदुनियाचे कौतुक केले. या पोर्टलद्वारे मराठी भाषेत ज्ञान मुलांपर्यंत पोहचणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.