बीटरूट इडली बनवण्यासाठी साहित्य-
-2 कप सिंगाड्याचे पीठ
- आवश्यकतेनुसार पाणी
- चवीनुसार मीठ
- एक कप दही
- एक बीटरूट
बीटरूट इडली बनवण्यासाठी या टिप्स फॉलो करा-
बीटरूट इडली बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात सिंगाड्याचं पीठ, चवीनुसार मीठ, दही आणि एक पाणी एकत्र करून या सर्व गोष्टींचे गुळगुळीत पीठ तयार करा. तुम्ही हे पिठ 10 मिनिटे तसेच राहू द्या. आता बीटरूट सोलल्यानंतर त्याचे तुकडे करून ब्लेंडरमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करा. ही बीटरूट पेस्ट इडलीच्या पिठात नीट मिसळा.
जर पीठ घट्ट दिसत असेल तर त्यात जरा पाणी घालता येईल. आता इडलीच्या साच्याला ग्रीस करा आणि साच्यात पीठ घाला. साचे एका स्टीमरमध्ये ठेवा आणि 12 ते 14 मिनिटे वाफवून घ्या. इडली चटणीसोबत सर्व्ह करू शकता.