साहित्य : 250 ग्राम उकडलेले बटाटे, 1 कप साबुदाणा, सैंधव मीठ आणि काळी मिरपूड पावडर चवीप्रमाणे, 1/2 कप भाजलेले शेंगदाणे, 2-3 हिरव्या मिरच्या, 1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1/2 लिंबू , तळण्यासाठी शेंगदाण्याचे तेल किंवा तूप.
कृती : सर्वप्रथम साबुदाण्याला धुऊन पाण्यात भिजवून ठेवा. थोड्यावेळानंतर त्यातले पाणी उपसून 1-2 तासांसाठी ठेवून द्या. शेंगदाण्यांना बारीक वाटून त्याचे कूट करा. बटाटे सोलून त्याला मॅश करून घ्या. यामध्ये साबुदाणा, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, सैंधव मीठ, काळीमिरी पावडर, लिंबाचा रस आणि शेंगदाण्याचे कूट टाकून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या आणि सारण तयार करावं.
आता एक कढईत तेल किंवा तूप गरम करावं. साबुदाणा-बटाट्याच्या मिश्रणाच्या छोट्या-छोट्या गोळ्या बनवून हळुवारपणे हाताने चपटा आकार द्या. आता मंद आंचेवर तांबूस रंग येई पर्यंत तळून घ्या. खमंग खुसखुशीत चविष्ट गरम-गरम साबुदाणा कटलेट तयार. हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करावे.