Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अ‍ॅपल बदाम खीर

अ‍ॅपल बदाम खीर

वेबदुनिया

साहित्य  : 1 वाटी ओले खोबरे, 15-17 बदाम, 2 सफरचंद, 1 लिटर दूध, 10 चमचे साखर, 1 वाटी खवा, केशर, वेलचीपूड. 

कृती  : सर्व प्रथम ओले खोबरे व बदाम क्रश करावे. त्यात थोडे दूध घालून पुन्हा मिक्सरमधून काढावे. तयार मिश्रण, दूध व खवा एत्र करून ते 8-10 मिनिट गरम करावे. नंतर त्यात साखर घालावी व पाच मिनिटे उकळावे. नंतर त्यात वेलचीपूड, केशर घालावे. दोन सफरचंद किसून घालावे. 4-5 मिनिटे उकळवावे. गॅस बंद करून वर बदामाचे काप ठेवून सजवावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन!