साहित्य : 5-6 बटाटे, सोललेले दाणे, खोबर्या कीस, काजू, बेदाणे, मीठ, साखर, जिरेपूड, मिरेपूड हिरव्या मिरच्या चिरून, वाळवून, तळून, तूप.
कृती : सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुऊन, सोलून, जाड किसणीने किसून घ्या. चिमूटभर तुरटी पाण्यात घालून, त्यात हा कीस एक-दीड तास भिजत ठेवा. नंतर चाळणीवर ओतून, निथळून घ्या. फडक्यावर पसरवा. थोडा सुकल्यावर तापलेल्या तुपात छान तळून घ्या. सर्व साहित्य घालून नीट कालवून घ्या.