Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दही-बटाटापुरी

दही-बटाटापुरी
साहित्य: राजगिर्‍याचं पीठ अर्धा कप, वर्‍याचं पीठ अर्धा कप, मोहन व मीठ.
 
इतर साहित्य: मॅश केलेले उकडलेले बटाटे, खजुराची गोड चटणी, घुसळलेले दही, तिखट, जिरेपूड, चिरलेली कोथिंबीर, बटाट्याचा तळलेला चिवडा.
 
कृती: दोन्ही पिठं, मीठ, मोहन घालून लहान पुर्‍या बनवा. टोचून तळा, चिमूटभर सोडा घातल्यास पुर्‍या खुसखुशीत होतील. बटाट्यात जिरेपूड, तिखट, मीठ घाला. डिशमध्ये 7-8 पुर्‍या ठेवून, त्यावर बटाट्याचं मिश्रण, दही, गोड  चटणी, चिवडा, कोथिंबीर घालून द्या.


Share this Story:

Follow Webdunia marathi