साहित्य : एक वाटी साबूदाणा, मीठ, तीन-चार ओल्या मिरच्या, अर्धी वाटी दाण्याचे कूट, साखर, कोथिंबीर, दोन वाट्या गोड ताक, एक वाटी गोड सायीचे दही, तूप.
कृती : साबूदाणा प्रथम भाजून घेऊन, धुऊन टाकावा व तो ताकात भिजवून, थोडा वेळ तसाच ठेवावा. तुपात जिरे व मिरच्यांचे टुकडे घालून फोडणी करावी. भिजवून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये वरील फोडणी, तसेच चवीप्रमाणे मीठ, साखर आणि दाण्याचे कूट घालावे आणि दही घालून साबूदाणा चांगला कालवावा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा