साहित्य : एक वाटी वरईचे तांदूळ, पाव वाटी साबूदाणा, अर्धी वाटी खवलेले खोबरे, एक चमचा जिरे, मीठ, दोन-तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे, तीन चमचे खोबर्याचे काप व काजूतुकडे. तेल.
कृती : सर्वप्रथम वरई तांदूळ व साबूदाणा ताकात रात्री भिजत घालावा. दुसर्या दिवशी सकाळी मिश्रणात तखवलेले कोबरे घालून मिक्सीतून बारीक करून घ्यावे. निर्लेप तव्यावर जर जाडसर छोटे उत्तपे पसरून घालावेत. त्यावर खोबर्याचे काप, हिरव्या मिरचीचे तुकडे व काजूचे तुकडे पेरावेत. झाकण ठेवून उत्तपा पूर्ण शिजू द्यावा.