Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Essay on My Father :माझे बाबा

Essay on My Father :माझे बाबा
, शनिवार, 12 जून 2021 (09:00 IST)
माझे बाबा हे चांगले वडीलच नव्हे तर माझे सर्वात चांगले मित्र देखील आहे,जे वेळोवेळी मला चांगल्या आणि वाईट गोष्टींबद्दल सावध करतात.
माझे बाबा नेहमी मला हार मानू नका आणि नेहमी पुढे वाढण्याची शिकवण देत मला प्रोत्साहित करतात.माझ्या बाबांपेक्षा चांगला दुसरा मार्गदर्शक कोणी नसणार.
 
माझे बाबा माझ्यासाठी एक आदर्श आहेत. कारण ते एक चांगले बाबा आहे.त्यांच्यात ते सर्व गुणआहे जे एका वडिलांमध्ये असतात.प्रत्येक मुलं आपल्या वडिलांचे चांगले गुण घेतात.जे त्याला त्याच्या पुढील आयुष्यासाठी कामी येतात.त्यांच्या कडे आपल्याला देण्यासाठी ज्ञानाचा अनमोल भांडार असतो.जो कधीही न संपणारा असतो.त्यांच्यातील काही वैशिष्टये त्यांना जगातील सर्वोत्कृष्ट बाबा बनवतात. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 संयम -बाबांमधील सर्वात महत्वपूर्ण गुण आहे धैर्य किंवा संयम ,ते नेहमी संयमाने कोणतीही परिस्थितीला व्यवस्थितपणे हाताळतात.कोणतीही परिस्थिती असो ते कधी चिडत नाही .आपल्यावर ताबा ठेवून ते परिस्थितीतून योग्य मार्ग काढून त्यातून पुढे वाढतात.कितीही गंभीर प्रकरणे असो ते नेहमी धैर्य आणि संयम ठेवतात.
 
 2 शांत-आपण बाबांकडून शिकले आहोत कोणत्याही परिस्थितीत शांत राहणे.कधीही रागाच्याभरात येऊन काहीही करू नका.जेणे करून नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल.बाबा नेहमीच संयमाने शांत राहून युक्तीने प्रत्येक कार्य यशस्वीरीत्या पार पाडतात.ते आई वर किंवा आमच्यावर उगाचच रागावत नाही.
 
3 शिस्त- वडील आपल्याला नेहमीच शिस्तीत राहायला शिकवतात आणि ते स्वत: देखील शिस्तबद्ध असतात. सकाळपासून रात्री पर्यंत त्याची संपूर्ण दिनचर्या शिस्तबद्ध आहे. रोजच्या कामातून निवृत्त झाल्यावर ते सकाळी उठतात आणि ऑफिसात जातात संध्याकाळी घरी येतात.दररोज आम्हाला वेळ देतात आणि बागेत फिरायला नेतात.नंतर आमचा अभ्यास घेतात.
 
4 गांभीर्य -बाबा नेहमी घरातील सर्व कामांकडे आणि कुटुंबियातील सर्व सदस्यांच्या आरोग्याला घेऊन नेहमी गंभीर आहे.ते अगदी छोट्या-छोट्या गोष्टींकडे बारीक लक्ष देतात.ते कधीही त्याकडे दुर्लक्ष करत नाही तर आम्हाला त्याचे महत्व समजावतात.
 
5 प्रेम-  बाबा आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात ते आपल्या मुलांना कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाही.मुलांच्या सर्व गरजा पूर्ण करतात.मुलांकडून   काहीही चुकले तर ते रागावत नाही तर प्रेमाने मुलांना समजवतात.आणि पुन्हा तशी चूक न करण्याची शिकवण देतात.
 
 
6 मोठे मन -बाबांचे मन खूप मोठे आहे,बऱ्याच वेळा त्यांच्या कडे पैसे नसताना देखील ते आमच्या सर्व गरजा पूर्ण करतात.ते आम्हाला कोणत्याच गोष्टीसाठी कधीही कमी पडू देत नाही.मुलांनी काही चूक केली तर त्यांना काही काळ रागावून क्षमा करून देतात.
 
ते त्यांचा त्रास कोणाला सांगत नाही ते घरातील प्रत्येकाच्या गरज पूर्ण करण्याची काळजी घेतात.त्यांच्यातील हेच वैशिष्टये त्यांना खूप मोठं बनवतात.त्यांची तुलना जगातील कोणाशीही केली जाऊ शकत नाही.
 
बाबा हे प्रयेक मुलासाठी साक्षात देवाचे रूप आहे.ते आपल्या मुलांना सुख देण्यासाठी स्वतःचे सुख विसरतात.ते दिवसरात्र आपल्या मुलांसाठी काम करतात. बऱ्याच वेळा आपल्या मुलांना चांगले शिकविण्यासाठी स्वतः कर्जबाजारी होतात.परंतु आपल्या मुलांना नेहमी सुखी ठेवण्यासाठी धडपड करतात. त्यांना होणार त्रास ते कोणालाच सांगत नाही.म्हणून बाबा या जगात सर्वात महत्वाचे आहेत.
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

येत्या ऑगस्टअखेरपर्यंत जनतेला जास्तीत जास्त प्रमाणात लस कशी देता येईल असा प्रयत्न करणार - अजित पवार