आपल्याकडे वडिलाबद्दल फारच कमी बोलले जाते. आईबद्दल भरभरून बोलले जाते. आईचा महिमाही तसाच आहे, परंतु आज वडिलांबद्दलच. काल आमच्या एका धर्माच्या ताईला, त्यांच्या वडिलांची आठवण झाली. आम्हालाही आमचे वडील आठावले आम्हीही त्यांना 'अन्ना' असेच म्हणायचो. आमच्या वडिला बद्दल पुन्हा कधी तरी लिहील परंतु 'पुरूष हृदय' काय असते ह्याचा एक नमुना अवश्य सांगतो.
1972 चा दुष्काळ होता, सूर्य अक्षरशः आग आकत होता, पाण्यासाठी लोक कित्येक किलो मीटर अनवाणी जायचे. गावाचे सरपंचच काय गावाचे पाटील व गावातील प्रतिष्ठीत लोक रोजगार हमीच्या दररोज मारामार असायची... उपाशी तपशी दिवस व रात्र काढणे तर नित्याचेच होत. मी तेव्हां 6/7 वर्षाचा असेल, घरात खाणारी आम्ही सहा भावंडे व आई वडील... शिळ्या तुकड्या वरून ही आम्हा भावंडात ओढा ओढी होत असे... ते शिळे तुकडे ही शिल्लक नव्हते ...आई ने सांगितले, वडिलांना बघ म्हणून... मी अनवाणीच दगड काटे तुडवीत मी दूर माळ रानावर वडिलांना एका दगडावर बसलेले पहिले...आजू बाजूला दूर दूर पर्यंत कुणीच नव्हते ...जवळ जाऊन पाहतो तर आमचे आण्णा जोर जोरात ओक्साबोक्षी रडत होते ....अगदी हंबरडा फोडूनच... मी हि त्यांच्या सुरात सूर मिळवला... पण कळले काहीच नाहीं... तो प्रसंग अजूनही मनात घर करून राहिलेला आहे...
...तर सांगायचा मुद्दा हा होता कि पुरूष हृदय हे विशाल वट (वड) वृक्षा सारखे असते...वरून सर्व आलबेल दिसत असते ....सर्वाची काळजी घेत असते... सर्वांची किलबिल ह्यांच्या हृदयाला फुटलेल्या फांद्यावर, पानावर, फुलावर, फळावर सुरू असते ...आणि हे असते तटस्थ, कुठल्याही भावना मनातल्या मनात जिरवून...
... अन एक दिवस.... काही कळायच्या आत धाडदिशी उन्मळून पडतात... कोसळतात... नंतर आपल्याला कळते...अरे आपण पोरके जालोय ...आपले आकाशच हरवले आहे ... आपल्या पंखाना जरी बळ आलेले असले, ...तरी, पाय स्थिर पणे ठेवावेत असा आधारच राहिला नाहीं... आमचाही आधार पणे ठेवावेत असा आधारच राहिला नाहीं... आमचाही आधार असाच 8 वर्ष पूर्वी निघून गेला....असो.