प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांची भूमिका सर्वात महत्वाची असते.
तेच आपल्या सर्व स्वप्नांना आणि इच्छांना आधार देतात.
ते खूप त्याग करतात पण आपल्याला साथ देणे कधीच थांबवत नाही.
कोणत्याही धकाधकीच्या प्रसंगात सगळ्यात आधी आपल्या वडिलांची आठवण येते.
संपूर्ण कुटुंब एका वडिलांच्या खांद्यावर अवलंबून असतं.
प्रत्येकाच्या आयुष्यात वडील हे पहिले शिक्षक आहेत जे आपल्याला चांगले काय आणि वाईट काय हे शिकवतात.
ते आपल्याला शिष्टाचार आणि नैतिकता शिकवतात.
आपल्या जीवनात वडील आपल्याला मार्गदर्शन करतात जेणेकरून आपण योग्य निर्णय घेण्यात सक्षम होतो.
शिस्तीचा अर्थ आपण आपल्या वडिलांकडून शिकतो.
आपल्या जीवनातील नायकाचे कौतुक करण्यासाठी आपण जूनमध्ये फादर्स डे साजरा करतो.