Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरात ठेवा फक्त ताजी फुले

घरात ठेवा फक्त ताजी फुले
NDND
निसर्ग आणि मानवाचा अन्योन्य संबंध आहे. म्हणूनच निसर्गाचा हिरवा रंग आपल्याला आकर्षून घेतो. हिरवे काहीही पाहिले की मन प्रसन्न होते. निसर्गातील हिर्वी गर्दी मनाला तजेला देते. उत्साह देते. हा उत्साह रोज मिळावा म्हणूनच आपण घरोघरी रोपे लावती. फेंगशुईत रोपांना महत्त्व आहे. रोपे घरात किंवा कार्यालयात लावतो तेव्हा 'यांग' नावाची ऊर्जा निर्माण करतात. त्यामुळे घरात छान, प्रसन्न वातावरण निर्माण होते.

webdunia
NDND
त्यामुळे ताजी, टवटवीत फुले घरात ठेवावीत. दिवाणखान्यातील फुलदाणीत अशी फुले असावीत. पण ही फुले सुकल्यावर किंवा मरगळल्यावर मात्र तेथून काढून टाकावीत. त्यांच्या जागी ताजी, टवटवीत फुले ठेवली पाहिजेत. शेवटी ताजी, टवटवीत फुले हे जीवनाचे प्रतीक आहे, तर सुकलेली फुले हे मृत्यूचे. सुकलेली, मरगळलेली फुले 'यिन' ऊर्जा प्रवाहित करतात. ती घराला नैराश्याच्या आवर्तात ढकलते. म्हणूनच कितीही प्रिय व्यक्ती असली, तरी तिचे शव घरात ठेवले जात नाही. तसेच जी वस्तू मृत आहे किंवा यिन ऊर्जेचे प्रतीक आहे, ती घरात ठेवू नये.

webdunia
NDND
फुलांची रोपे शयनगृहात न ठेवता, ती दिवाणखान्यात ठेवावीत. किचनमध्ये ठेवली तरी चालेल. आजारी व्यक्तीच्या शयनगृहात फुलांची रोपटी ठेवणे हे त्याला रोगातून बरे करण्यासाठी उपयुक्त ठरते. ताज्या फुलांऐवजी कृत्रिम फुले-म्हणजेच प्लॉस्टिकची किंवा मखमलीची, रेशमाची फुलेही ठेवली जातात. पण यासाठी विशेष प्रक्रियेद्वारे सुकवलेल्या नैसर्गिक फुलांचा उपयोग नको.

Share this Story:

Follow Webdunia marathi