Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रेमळ संबंधांसाठी लव्ह बर्डस...

प्रेमळ संबंधांसाठी लव्ह बर्डस...
WD
युरोप आणि पाश्चात्य देशातील काही लोक आपल्या घरात 'लव्ह बर्डस' ठेवतात. हे बर्डस दांपत्य जीवनात प्रेम आणि आनंद आणतात. तुम्हीसुद्धा घरात लव्ह बर्डस ठेवण्यास इच्छुक असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. हे पक्षी पिंजर्‍यात बंद ठेवू नका. कारण ते बंद केले तर तुमच्या आपसातील संबंधांत दृढता येत नाही. तुमचं नातं बंधनात अडकल्यासारखं होतं.

webdunia
WD
फेंगशुईत वास्तू किंवा घराच्या दक्षिण-पश्चिम कोपर्‍याला प्रेमाचे क्षेत्र मानले आहे. या कोपर्‍याला प्रकाशमय ठेवल्याने दांपत्य जीवन प्रगाढ होऊन त्यांच्या प्रेमात वाढ होते. यासाठी शयनकक्षेत किंवा घराच्या दक्षिण-पश्चिम भागात 'मेडेरियन डक्स' ठेवणे लाभदायक असते.

अविवाहित युवक-युवतींच्या खोलीत दक्षिण-पश्चिम भागात 'मेडेरियन एक्स'चे जोडपे किंवा त्यांचे चित्र जरी ठेवले तरी त्यांचे लग्न लवकरात लवकर ठरते.

बाजारात निरनिराळ्या प्रकारचे 'मेंडेरियन डक्स' मिळतात. यात दक्षिण-पश्चिम कोपर्‍यात ठेवण्यासाठी रोज क्वार्टजपासून बनलेले 'मेंडेरियन डक्स'ला चांगले असतात. पण हे ठेवताना त्यांची संख्या नेहमी दोन असायला हवी, त्यात एक नर व दुसरी मादी हवी हे लक्षात ठेवा.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi