फेंगशुईनुसार पिरॅमिडचे महत्त्व
, गुरूवार, 24 मे 2012 (18:04 IST)
फेंगशुईत पिरॅमिडला फार महत्व आहे. तो जवळ ठेवल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. त्यातील काही फायदे खाली दिले आहेत.'
पिरॅमिड' धनाशी संबंधित बाबींमध्ये म्हणजे गल्ल्यात वगैरे ठेवावा. अधिका-यांनी कारमधील एखाद्या चांगल्या कप्प्यात ठेवला तरी चालेल. पिरॅमिड यंत्र कोणती कमतरता पूर्ण करते. आपली मनोकामनाही यामुळे पूर्ण होते. पिरॅमिड सकारात्मक उर्जा देतात. उर्जेची निर्मिती किंवा नाश करता येत नाही. नकारात्मक वातावरणात ठेवल्यास तेथील नकारात्मक कंपनांना पिरॅमिड सकारात्मक कंपनांत बदलतात. '
नाइन पिरॅमिड प्लेट' नाइन पिरॅमिड प्लेटचा उपयोग वातावरणातील सकारात्मक उर्जा प्राप्त करण्यासाठी केला जातो. आत्मविश्वासातील कमतरताही यामुळे भरून निघते. नऊ पिरॅमिड प्लेट्स नऊ ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात. या ग्रहांचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो. या प्लेटमुळे जीवनात अनेक चांगले, सकारात्मक बदल होतात. नऊ इंचाचे पिरॅमिड चिन्ह दोषानिवारणार्थ परिणामकारक आहे. श्रेष्ठ परिणामांसाठी याची स्थापना नैऋत्य किंवा ईशान्य दिशेला करावी.'
पायरा' पिरॅमिड नकारात्मक उर्जा शोषून घेतात. पिरॅमिड उर्जेचे स्वरूप बदलतो. नकारात्मक उर्जा जाऊन तेथे सकारात्मक उर्जा येते. पिरॅमिडची शक्ती क्षीण होत नाही. त्याचा वरचा भाग गरम व सकारात्मक उर्जा देतो तर खालील भागात थंड व नकारात्मक उर्जा असते.