आकर्षक लॅम्प शेड्स खोलीची शोभा वाढवतात. या लॅम्पसचा उपयोग पूर्वी केवळ प्रकाशासाठीच केला जात होता, पण आता सारी समीकरणं बदलली आहेत. आता एखादा लॅम्प घरात लावायचा म्हणजे तो सुंदर दिसावा हाच त्याचे उद्देश राहिला आहे. म्हणूनच बाजारात हल्ली प्रकारचे लॅम्प मिळतात. वेगवेगळ्या आकार-प्रकाराचे हे लॅम्प बजेटनुसार आहेत. गरज आहे फक्त आपल्या कल्पनाशक्तीला आकार देण्याची.
लॅम्प शेड्स बनवण्यासाठी तुम्हाला बाजारातून काहीच विकत आणण्याची गरज नाही. याला आपण घरी असलेल्या विविध वस्तूंच्या साहाय्यानेही बनवू शकतो. जसे ह्या मोठ्या शंखाच्या जवळपास काही लहान-मोठे शिंपले आणि शंख सजवून एका प्लेटमध्ये ठेवा व त्यात एक छिद्र करून बल्ब लावून द्या मग पाहा एक सुंदर लॅम्प शेड तयार होऊन जाईल.
याच प्रमाणे हँडमेड क्रॉफ्ट पेपर, जाड जरीचे कापड किंवा जुन्या कचांचे तुकडे वापरूनसुद्धा लॅम्पशेड बनवू शकता.