नवग्रह अतृप्त असल्याने घरातील मुख्य पुरुष तसेच कुटुंबातील सदस्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत असते. नवग्रहांची शांती केल्यास त्या अडचणीतून मुक्त होता येते.
ग्रहशांचे उपाय- सूर्य- सूर्याची शांती करण्यासाठी रविवारी दुपारी केवळ दही आणि भाताचे सेवन करावे. 21 कमळ गणपतीला अर्पण करावीत. त्या दिवशी मीठयुक्त पदार्थ खाऊ नये.
चंद्र- चंद्राची शांती करण्यासाठी 'ॐ नम:शिवाय' या मंत्राचा जप करावा. पांढरे फूल नदी किंवा विहिरीत अर्पण करावे. चांदीच्या भांड्यात पाणी प्यावे. सूर्यास्त झाल्यानंतर दूध पिऊ नये.
मंगळ- मंगळ ग्रहाची शांती करण्यासाठी मसूरची दाळ व गुळाचे पदार्थ मंगळवारी खावे. गणपतीचे दर्शन घ्यावे.
गुरू- गुरुची शांती करण्यासाठी चमेलीची 12 फूले वाहत्या पाण्यात प्रवाहीत केले पाहिजे. पिवळ्या कन्हेरचे फूल गुरुला अर्पण करावे.
शुक्र- शुक्र ग्रहाची शांती करण्यासाठी 'ॐ नम: शुक्राय नम:' या मंत्राचा जप करावा. पांढरे फूल पाण्यात प्रवाहीत करावे. गायीला ज्वारी खाऊ घालावी.
शनि- शनि ग्रहाची शांती करण्यासाठी खोबरेल तेलात कापूर टाकून ते तेल आपल्या केसांना लावावे. काळे उडीद भिखारीला दान करावे. शनिवारी लोखंड किंवा स्टिलच्या भांड्यात नाश्ता किंवा भोजन करू नये.
राहू- राहूची शांती करण्यासाठी काळे धोतर्याचे फूल शिवशंकराला वाहावे. लोखंड अर्थात स्टिलच्या भांड्यात नाश्ता करू नये.
केतु- केतुची शांती करण्यासाठी लोखंड किंवा स्टेनलेस स्टिलच्या भांड्यात नाश्ता अथवा जेवन करू नये.