Article Fengsui Article %e0%a4%98%e0%a4%b0 %e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%be %e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%88%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0 108022700017_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घर रंगवा फेंगशुईनुसार

घर रंगवा फेंगशुईनुसार
NDND
रंग आणि माणसाचे नाते फार जुने आहे. रंगांचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. रंगांमध्ये लाभदायी गुण असतात, त्याचवेळी काहींना त्याच्या नुकसानदायी अवगुणांचा फटकाही बसतो. रंगाचे ज्ञान असो वा नसो आपल्यावर त्याचा प्रभाव पडतोच. उदाहरणच घ्या. तुम्ही भडक लाल रंगाच्या शयनकक्षात झोपला असाल किंवा काळा रंग असलेल्या स्वयंपाक घरात स्वयंपाक करीत असाल तर त्या रंगाचा नक्कीच काहीना काही नकारात्मक प्रभाव पडेलच. काही रंग व्यक्तीला रागीट बनवितात तर काही रंग त्याच्या भावना शांत करतात.

फेंगशुईनुसार रंग परावर्तित प्रकाशाला नियंत्रणात मदत करतात. तीव्र प्रकाश गरम रंगांना अजूनच गरम आणि भडक बनवितो. पण थंड आणि मध्यम प्रकाश याविरुद्ध कार्य करतो.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला घरातील सदस्यांच्या वृत्तीनुसार रंग योजना केली पाहिजे. कारण घरातील प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे रंग पसंत असतात. पण रंग निवडताना आपल्या तत्त्वाच्या विरुद्ध रंग निवडू नका. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचे तत्त्व अग्नी असेल तर त्याच्यासाठी भडक निळा रंग आणि काळा रंग नुकसानकारक ठरेल.

त्याप्रकारेच छताचा रंग देखील काळजीपूर्वक ठरविला पाहिजे. छताला गर्द रंगापेक्षा हलका रंग उत्तम आणि शुभ असतो. त्यासोबतच गर्द रंगांवर 'ची'चा प्रभाव हवा तसा पडत नाही. शयनकक्षेसाठी‍ कोमल रंग उपयोगी ठरतात. मन शांत राहील असाच रंग शयनकक्षेचा असावा. भडक रंग शयनकक्षासाठी नुकसानकारक असतात.

नारंगी, पिवळा, हिरवा रंग पृथ्वीचे रंग मानले जातात. त्यांचा उपयोग स्वयंपाक घरासाठी केला जाऊ शकतो. निळा रंग शक्यतो टाळावा. कारण हा रंग व्यक्तीला शांत आणि अंतर्मुखी बनवितो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या रुचीनुसार आणि आवडीनुसार असे रंग निवडावेत जे त्याच्या व्यक्तिमत्वानुसार त्याच्या भावनांना अभिव्यक्ती देऊ शकतील. या प्रकारे रंग माणसाच्या जीवनावर प्रभाव टाकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi