Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फेंगशुई आणि गार्डन

फेंगशुई आणि गार्डन
ND
सुंदर गार्डन, त्यात आकर्षक रोपे, मनमोहक फुले हे कुणाला आवडत नाही? प्रत्येक घरात थोडीफार जागा गार्डनसाठी सोडली जाते. पण बर्‍याचदा ही जागा काहीही उपयोग न करता तशीच पडून राहते. थोडा विचार, मेहनत आणि हुशारीचा वापर करून तुम्ही तुमच्या घराला आकर्षक बनवू शकता. घरातील ही हिरवळ तुम्हाला सतत प्रसन्न ठेवू शकते.

गार्डन बनविण्यासाठी सर्वात आधी जागा ठरवा. समोरच्या जागेत गार्डन बनवू इच्छिता तेथील जागेचे माप लक्षात घ्या. किती जागेत गार्डन हवे आहे? हे ठरवा. त्यानंतर आपले आवडते फूल-रोप, आवडती झाडे निवडा. गार्डनला तुमच्या इच्छेनुसार दोन किंवा तीन भागात देखील विभागू शकता. त्यानंतर या भागात वेगवेगळ्या प्रकाराची फुलांची रोपे लावा. आवडत असल्यास आणि शक्य असेल तर गुलमोहर, कडुनिंब किंवा आंबा यासारखे इतर झाडांची रोपेदेखील लावू शकता.

ही झाडे आरोग्यासाठी चांगली असतातच पण त्यासोबतच उन्हाळ्यात शुद्ध हवेसाठी यापेक्षा चांगला कोणताच पर्याय नाही. लहान-लहान रोपे लावले गेल्यानंतर बाकीच्या जागेवर लॉन करू शकता.

रोपांचे बीज वाटेल तिथे पेरू नका. व्यवस्थितरित्या लावा. म्हणजे रोप मोठे झाल्यानंतर विचित्र वाटणार नाही. दोन रोपांच्या दरम्यान थोडी जागा ठेवा. त्याने झाडांचे-रोपांचे मूळ पसरण्यात अडथळा निर्माण होणार नाही. गार्डन बनवताना घराच्या जागेच्या हिशोबानेच बनवा.

गार्डन बनविण्याचा आणि झाडे लावल्याने ते फेंगशूईचा प्रभाव वाढवितात हा एक फायदा आहे. फेंगशुईनुसार स्वस्थ आणि बळकट झाडे तुमच्या घरात आनंद तर आणतातच त्यासोबतच घरातील प्रत्येक कोपर्‍यात उत्साह पसरवतात. फेंगशुई झाडे जैविक तत्त्वांना शक्तिशाली रूपाने संचारित करतात आणि नकारात्मक प्रभावाला दूर करतात. त्यामुळे घरासमोरील रिकाम्या जागेत झाडे लावायला हवीत.

'मनी प्लांट'चे रोप एका कोपर्‍यात लावण्याने त्या जागेची उदासीनता कमी केली जाऊ शकते. घराचा दक्षिण-पूर्व कोपरा धन आणि समृद्धीचा कोपरा मानला जातो. त्यामुळे त्याजागी मोठी पाने असणारी रोपे लावायला हवी.

कोमेजलेले किंवा वाळलेले रोपे लगेच काढून टाकायला हवे. घराच्या समोरील भागात काट्याचे किंवा अणूकुचीदार पाने असणारी रोपे लावू नयेत. या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही फेंगशूईचा फायदा घेऊ शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi