Article Fengsui Article %e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be %e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80 %e0%a4%b8%e0%a4%9c%e0%a4%b5%e0%a4%be %e0%a4%98%e0%a4%b0 108041600023_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फेंगशुईच्या साधनांनी सजवा घर

फेंगशुईच्या साधनांनी सजवा घर
NDND
लोक घर बांधतांना ते आपल्याला अनुरूप असावे यासाठी बरेच प्रयत्न करतात. पण दिशेकडे लक्ष देत नाहीत. कारण प्रत्येक दिशा प्रत्येक माणसाला अनुकूल असते असे नाही. जी लोकं भाड्याने रहातात, त्यांना तर मिळेल ते घर अनुकूल आहे, असे मानून घ्यावे लागते. सहाजिकच अशा घरात रहाण्याने त्रास झाला तरी तो सहन करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नसतो.

अशावेळी घरात जास्त तोडफोड न करता फेंगशुईच्या साधनांचा वापर करून घराला अनकूल बनवू शकता. या साधनांचा वापर करून फेंगशुईची सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात आपण वाढ करू शकता. हे केल्याने आपल्या आर्थिक वैवाहिक समस्या, मुलांचे बिघडणारे आरोग्य, विनाकारण होणारी भांडणे, शेजार पाजार्‍यांशी होत असलेली धुसफूस यापैकी बर्‍याचशा समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल.

मासे, आरसा, क्रिस्टल, घंटी, बासरी, कासव, हॅपी मॅन, जीवन यान या फेंगशुई साधनांच्या सहाय्याने आपण घरात बदल करू शकता.

* तुमच्या घरात फिशटॅंक असेल तर सावधान. फिशटॅंक योग्य जागी असल्यास चांगलेच. त्यामुळे तुमच्यावर दैवी कृपा होईल. पण त्याची जागा चुकल्यास कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येईल. शिवाय दिवाळखोरी, मानसिक दडपण यांचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

* फेंगशुई शास्त्रात डॉल्फिन मासा शुभ प्रतीक आहे. आपल्या घर व कार्यालयातील उत्तर किंवा आरोग्याशी संबंधित कोप-यात त्याला ठेवता येईल. आजार लवकर बरा होण्यासाठी व आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू नयेत यासाठी याची स्थापना करावी.

* मासे परीक्षेत यश, नोकरीत पदोन्नती आणि यशाचे प्रतीक आहेत.

webdunia
WD
* फेंगशुईनुसार घरात 'हॅपी मॅन' असेल तर हे सकारात्मक दृष्टिकोन, उत्साह व आनंदी जीवनाचे प्रतीक मानले जाते. हे प्रतीक घरात ठेवल्यामुळे दुःख: दूर होऊन आनंदी राहण्यासाठी प्रेरणा मिळते. याची स्थापना कार्यालयात किंवा घरात केल्यास जीवनात परिवर्तन झाल्याचा अनुभव येतो.

* फेंगशुईतील नाणी धातू तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतात व संपत्तीचे प्रतीक असतात. याचा वापर वाईट बाबींना व रोगराईला दूर ठेवण्यासाठी केला जातो.

* चीमध्ये एक अदृश्य शक्ती असते जी मनुष्य तथा वातावरणाला आपसांत जोडून ठेवते. याचा वापर करून आपल्या नशीबात बदल घडवू शकता.

* चीला ब्रह्मांडीय ऊर्जासुद्धा म्हणतात. ही मेंदू आणि पदार्थांना एकत्र करते. ही उर्जा चेंडूसारखी असते. नैसर्गिक चक्राला ती आपसांत जोडून ठेवते.

webdunia
WD
* फेंगशुईमध्ये आरशाचा प्रयोग महत्त्वाचा आहे. आरशाचा उपयोग केवळ घर, कार्यालय व दुकानांच्या बाहेरच्या बाजूस लावले जाते. याचा उपयोग कधीही घराच्या आतल्या बाजूला करू नये. पलंगाच्या पायथ्याशी आरसा ठेवणे चांगले नसते.

* विंड चाइमचा मधुर आवाज मनाला शांती देतो. दुःख दूर करतो. भय, तणाव व क्रोधाला दूर करतो. संगीताचा आपल्या शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. ध्वनीची कंपने व आवाज तणाव व शरीरातील भावनात्मक अडचणींना दूर करून मनाला शांतता देतो. मन शांत राहिल्याने जागरूकता वाढते व आत्म्याशी संबंध मजबूत होतात. या प्रकारे विंड चाइम उपयुक्त ठरते.

तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनांतील अडचणींनी ‍त्रस्त झाला असाल तर वर दिलेल्या फेंगशुई साधनांचा वापर करून फायदा घेऊ शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi