अनेक लोकांना पुस्तके वाचण्याचा छंद असतो आणि त्यांना आपल्याजवळ खूप पुस्तके असल्याचा अभिमानही असतो. पुस्तक वाचनाचा छंद ही खचितच चांगली सवय आहे. परंतु ही पुस्तके जर खोलीतील बिनदरवाजाच्या म्हणजेच उघड्या मांडणीत ठेवली गेली, तर ती 'अशुभ ऊर्जा' किंवा 'श्वास कोंडणारी शक्ती' निर्माण करते. ही अशुभ ऊर्जा या खोलीत राहणार्या व्यक्तीसाठी खूपच हानीकारक असते.
कार्यालयातील अथवा घरातील पुस्तकांची बनदरवाजाची मांडणी ही सुरीसारखी असते. ती बिनदरवाजाची मांडणी नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकत असते आणि ती प्रतिकूल फेंग शुई असते.
या बिन दरवाजाच्या मांडण्यांमुळे खोलीत राहणारी व्यकती आजारी पडू शकते आणि कधी कधी हे आजारपण जीवघेणेही ठरू शकते. याचा प्रभाव भले लगेच दिसून येत नसेल, पण वेळ आल्यावर या प्रभावाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. यामध्ये सुधारणा करण्याचा सर्वांत चांगला उपाय म्हणजे सर्व मांडण्यांचे दरवाजे उघडे न ठेवता, नेहमी बंद ठेवावेत. यामुळे उघड्या मांडण्यांचा प्रतिकूल प्रभाव कमी होईल.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा