सिंगापुरी कासवं फेंगशुईच्या रूपांत घरी व दुकानात दिसू लागले आहेत. या कासवांचे आयुष्य अधिक असल्यामुळे त्यांना घर-दुकानात ठेवल्याने सुख, समाधान, प्रगती तसेच घरच्या मंडळींच्या आयुष्यातसुद्धा वाढ होते, अशी चीनमध्ये समजूत आहे.
अनेक जण आपल्या दुकानात या कासवांना ठेवतात. 500 रुपयात मिळणार्या ह्या कासवांचे आयुष्य किमान 200 वर्ष तरी असते. पण आपल्या आयुष्यात ते फक्त 2-3 इंचापेक्षा जास्त वाढत नाही. दिसायला अत्यंत सुरेख असलेले हे कासव खाद्यपदार्थांच्या रूपातही हॉटेलमध्ये मिळते. हे जेवण महिनाभर टिकते. दुकानदार रात्रीच्या वेळेस दुकान बंद करताना ह्या कासवांना जमिनीवर सोडून देतात, हे उभयचर प्राणी दोन्ही परिस्थितीत स्वत:ला जगविण्यास समर्थ असतात.