Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सृजन फुलण्यासाठी...

सृजन फुलण्यासाठी
WD
जीवनाकडे रोज वेगळ्या नजरेने बघतो, तोच यशस्वी ठरतो. सृजनशील, नाविन्यपूर्ण कल्पना सुचलेल्या व्यक्ती फार काळ अयशस्वी राहू शकत नाहीत. पण ही सृजनता येते कुठून? कधी याचा विचार केला आहे का? काही लोकांना वाटते, की सृजनशीलता जन्मजात असते, पण काही गोष्टींकडे लक्ष दिले तर आपण सृजनशील बनू शकतो.

* सूर्याचा संबंध सृजनाशी असतो. म्हणून जेव्हा सृजनात्मक काम करायचे असेल तेव्हा आपले तोंड सूर्याकडे वळवावे.

* घरात प्रत्येक ठिकठिकाणी चपला उलट्या पडलेल्या नसाव्यात. नाहीतर भांडणे होतात. त्यामुळे सृजनशीलतेवर दुष्प्रभाव पडतो.

* टेलिफोन किंवा मोबाईल जवळ पाण्याचा जग किंवा बाटली नसावी. कारण टेलिफोनच्या तारेमुळे येणारी इलेक्ट्रिक रेंज पाण्याला प्रदूषित करते.

* भाज्यांना नेहमी भांड्यातच चिरा. जमिनीवर ठेवल्याने त्यातील पोषक घटक संपून जातात. यामुळे शारीरिक व मानसिक क्षमतांवर परिणाम पडतो.

* घर किंवा ऑफिसमध्ये अडगळ सामान ठेवू नये. या वस्तू विपरीत परिणाम घडवतात. अशा व्यक्ती नकारात्मक विचाराच्या बनतात.

* डोक्याच्या संबंध सूर्याशी असतो, म्हणून विद्यार्थ्यांनी रोज सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करावे.

* मुलांनी पूर्वेकडे तोंड करून वाचले तर त्यांच्या लक्षात रहाते.

* डोक्याची डावी बाजू सृजनशीलतेचे प्रतिनिधित्व करते. म्हणून असे आढळले आहे की डाव्या हाताने काम करणार्‍या लोकांची सृजनात्मकता उजव्या हाताने काम करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi