Article Fengsui Article %e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0 %e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0 %e0%a4%b9%e0%a4%b5%e0%a5%87 108020700003_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वयंपाकघरासमोर दार हवे

स्वयंपाकघरासमोर दार हवे
स्वयंपाकघराचे घरात फारच महत्त्वाचे स्थान आहे. कारण संपूर्ण कुटुंबासाठी याच ठिकाणी स्वयंपाक तयार केला जातो. आणि हाच आहार प्रत्येकाला शक्ती देतो. त्यामुळे घरातील सदस्याला काम करण्याची ऊर्जा मिळते.

स्वयंपाक घरात 'ची' केवळ स्वयंपाक तयार करणार्‍या व्यक्तीवरच नाही तर संपूर्ण कुटुंबावर आपला प्रभाव टाकतो. याचा प्रभाव तयार केलेल्या स्वयंपाकावर देखील होतो. तयार केलेला स्वयंपाक नकारात्मक 'ची'च्या वातावरणात झाला तर त्याचा प्रभावही नकारात्मक रूपातच होईल. यामुळेच स्वयंपाकघर महत्त्वाचे असते.

NDND
स्वयंपाकघराचे दार
स्वयंपाक घरात आवश्यक तेवढा प्रकाश येईल याची काळजी घ्या. स्वयंपाक घराचे द्वार गॅस आणि फ्रीजसमोर येणार नाही याकडे लक्ष द्या. स्वयंपाकघर भोजनकक्षाला लागून असेल तर या दोघांमध्ये पडदा लावा. स्वयंपाकघर अन्य खोलीशी लागून असेल तरीही एका दाराला पडदा लावा.

गॅस
webdunia
NDND
गॅस स्वयंपाकघरातील महत्त्वपूर्ण भाग आहे. कारण गॅसवरच गृहिणी कुटुंबाकरिता स्वयंपाक तयार करीत असते. स्वयंपाक तयार करताना दार दिसेल अशाच ठिकाणी गॅस ठेवा. हे शक्य नसेल तर दार दिसेल अशा रितीने आरसा लावा. गॅसजवळ काम करताना थकवा यायला नको. कारण 'ची'च्या सकारात्मक प्रभावासाठी हे अशुभ मानले जाते. या जागी गृहिणीला थकवा जाणवत असेल तर गॅस एका कोपर्‍यात असण्याची शक्यता आहे. ही समस्या सोडविण्यासाठी तांबे किंवा एखादा पारदर्शी धातू लटकवून मोठी जागा असल्याचा आभास निर्माण करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi