Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डार्क हॉर्स फ्रान्स इतिहास रचणार?

डार्क हॉर्स फ्रान्स इतिहास रचणार?
कझान , बुधवार, 13 जून 2018 (14:35 IST)
रशियात खेळल्या जाणार्‍या 21व्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत डार्क हॉर्स मानला जाणारा फ्रान्सचा संघ या स्पर्धेत नवा इतिहास रचणार का? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.
 
फ्रान्सचा संघ येथे येऊन दाखल झाला आहे. फ्रान्स क गटात आहे. या गटात ऑस्ट्रेलिया, पेरू, डेन्मार्क असे चार संघ आहेत. फ्रान्साला सोपा ड्रॉ ठरेल, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार आहे. चार संघातून गुणानुक्रमे पहिले दोन संघ पुढच्या बाद फेरीस पात्र ठरणार आहेत. साखळीत तीनपैकी दोन सामने जिंकणारा संघ स्पर्धेत पुढे जाऊ शकतो. 16 जून रोजी फ्रान्स ऑस्ट्रेलिाविरुध्दच्या सामन्याने विश्वचषक मोहिेमेस प्रारंभ करणार आहे.
 
फ्रान्सचा संघ हा सर्वात प्रतिभावान असावा. त्याचे कारण म्हणजे संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचे सुंदर मिश्रण आहे. दुसरे कारण म्हणजे या संघात स्वतःच्या जोरावर सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत.
 
या वर्षाच्या संघात 1998 सालच्या दिदिएर देशचॅम्पस याच्या संघाची झलक पाहायला मिळते. 1998 साली फ्रान्सने विश्वचषक जिंकला होता. त्या विश्वजेत्या संघात देशचॅम्पस, झिनेदिन झिदाने, एमान्युएल पेटिट, मार्सेल डेसेली, लिलियन थुराम, फॅबियन बार्थेस असे दमदार व दिग्गज खेळाडू होते. फ्रान्सची त्यावेळची राखीव फळीही मजबूत अशीच होती.
 
यावेळच्या संघात पॉल पोग्बा, अन्यएन ग्रिएझमन, कायलियन एबाणे, एन्गोलेकान्ते, उस्मान डेम्बेले, ह्यूगो लोरिस, सॅम्युएल उमनिनीसारखे एकापेक्षा एक सरस खेळाडूंचा भरणा आहे. याच खेळाडूंच्या जोरावर फ्रान्सचा संघ 20 वर्षांनंतर विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहू लागला आहे.
 
ग्रिएझन, एमबाणे, जिकऊ, थॉमस लेचार या खेळाडूंवर फ्रान्सच्या आक्रमणाची जबाबदारी आहे. स्पेनच्या अ‍ॅटलेटिको माद्रिदकडून खेळणारा ग्रिएझमनने मागील मोसमात 49 सामन्यात 29 गोल केले होते. फ्रान्सच्या पॅरिस सेंट जर्मनकडून खेळणारा एमबाणे हा पहिलीच विश्वचषक स्पर्धा खेळत आहे. 19 वर्षाचा एमबाणे हा फॉर्मात आहे. गेल्या मोसमात त्याने 44 सामन्यांमध्ये 21 गोल केले आहेत. ग्रिएझमन आणि एमबाणेला ऑलिव्हिएर जिरूड आणि थॉमस लेमार पर्याय असतील. या दोघांनी व्यावसायिक फुटबॉलमध्ये आपला ठसा उमटविला आहे.
 
पॉल पोग्बा, एन्गोलो कान्ते, उस्मान डेम्बेले या खेळाडूंवर आघाडीच्या फळीचे काम सोपविण्यात आले. 2014 सालचा विश्वचषक खेळण्याचा अनुभव पोग्बाच्या पाठीशी आहे. पोग्बामध्ये स्वतः गोल करण्याची  आणि इतर खेळाडूंना गोल करण्यास मदत करण्याची क्षमता आहे. पोग्बाने मागील मोसमात मँचेस्टर युनायटेडकडून समाधानकारक कामगिरी केली आहे. 2018 च्या विश्वचषक पात्रता फेरीत पोग्बाने नेदरलँडस आणि स्वीडनविरुध्द गोल केले आहेत.
 
फ्रान्सचा कर्णधार आणि गोलरक्षक ह्यूगो लोरिस याला 98 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. ह्यूगोने 2010 आणि 2014 साली दोन विश्वचषकात फ्रान्सचे प्रतिनिधित्व केले आहे. फ्रान्सने 14 वेळा विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला आहे. 1998 साली फिफा विश्वचषक फ्रान्सने जिंकला होता तर 2006 साली फ्रान्सने उपविजेतेपद मिळविले होते. 2014 साली ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात फ्रान्सचे आव्हान उपान्त्यपूर्व फेरीत संपले.
 
प्रशिक्षक देशचॅम्प्स यांना एक खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून 33 वर्षाचा अनुभव आहे. फुटबॉलमधील अनेक चढउतार त्यांनी पाहिले आहेत. 1990 आणि 1994 साली अपात्र ठरलेल फ्रान्सच्या संघाला देशचॅम्पस यांनी 1998 साली विश्वचषक जिंकून देण्याचा पराक्रम केला होता. प्रशिक्षक म्हणून 17 वर्षाचा त्यांना अनुभव आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पत्नी आणि मुलगी यांच्यातील वादामुळे परेशान होते भय्यु महाराज, मुलीच्या खोलीत स्वत:ला झाडली गोळी