Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आलियाला आवडतो शाहिद

आलियाला आवडतो शाहिद
, बुधवार, 23 जुलै 2014 (15:21 IST)
‘क्वीन’ चित्रपटाच्या यशानंतर विकास बहल ‘शानदार’मध्ये दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडणार असून, या चित्रपटात शाहिद कपूर आणि आलिया भट्ट ही नवी जोडी दिसणार आहे. याबाबत आलियाने या बातमीला दुजोरा दिला असून ती सांगते, ‘होय, मी विकास बहल यांचा शानदार करत आहे. मला त्यांचा क्वीन खूप आवडला होता.

आता शानदारमध्ये ते माझ्या पात्रासोबत काय नावीन्यपूर्ण प्रयोग करतात, हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.’ आलियाने या चित्रपटात आपण शाहिदसोबत काम करणार असून शाहिदबाबत ती म्हणाली की, ‘मी त्याची चाहती आहे. 11 वर्षाची असताना मी त्याचा इश्क विश्क पाहिला होता. तेव्हापासून मला त्याचा अभिनय आवडायला लागला.’ आलियाने आतापर्यंत काम केलेल्या नायकांमध्ये शाहिद कपूर त्याच्या अगोदरच्या पिढीतील अभिनेता आहे. शाहिदकडून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे असल्याचे देखील आलियाने सांगितले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi