Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॅशः अ‍ॅक्शनला विनोदाची फोडणी

कॅशः अ‍ॅक्शनला विनोदाची फोडणी
दिग्दर्शकः अनुभव सिन्हा
संगीतः विशाल-शेखर
कलाकारः अजय देवगण, इशा देवल, सुनील शेट्टी, शमिता शेट्टी, झायेद खान, रितेश देशमुख

दस हा चित्रपट दिग्दर्शित करणारे अनुभव सिन्हा आता तशीच तगडी स्टारकास्ट घेऊन कॅशद्वारे प्रेक्षकांना भेटायला येत आहेत. दसच्या माध्यमातून थ्रिलर चित्रपट आपण चांगला हाताळू शकतो हे सिन्हा यांनी दाखवून दिले होते. तोच आत्मविश्वास त्यांना कॅशसाठी उपयोगी पडला आहे.

pr
दसमध्ये बडे बडे स्टार होते. अ‍ॅक्शन होती. आणि चित्रपटाच्या वेगाला साजेशी गाणी होती. कॅशही याच यशस्वी फॉर्म्युल्यावर बनविला गेला आहे. शिवाय त्याला विनोदाची फोडणीही देण्यात आली आहे. हा चित्रपट पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेत तयार झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील एक हिरा चोरण्यासाठी अजय देवगण एक टोळी तयार करतो. यात इशा देवल, झायेद खान, दिया मिर्झा आणि रितेश देशमुख यांचा समावेश आहे. हा हिरा मिळविण्याचा प्रयत्न अंडरवर्ल्डचा डॉन सुनील शेट्टीही करत असतो.

webdunia
pr
त्याला अजयच्या टोळीविषयी कळते, तेव्हा तो त्याला हा प्रयत्न सोडून देण्यास सांगतो. हिऱ्याची सुरक्षितता जपण्याची जबाबदारी शमिता शेट्टीवर असते. या दोघांमधील संघर्ष चित्रपटात अतिशय रोचक, उत्कंठावर्धक पद्धतीने दाखविण्यात आला आहे.

चित्रपटातील अ‍ॅक्शन दृश्य त्याचे मुख्य बलस्थान आहे. असे चित्रपट आवडणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. याशिवाय यात असलेल्या प्रत्येक स्टारच्या चाहत्यांनी चित्रपटाला जायचे ठरविले तरीही तो हीट होण्याची शक्यता जास्त आहे. थोडक्यात अनुभव सिन्हाने डोके चालवून स्टारकास्ट घेतली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi