Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जॅकपॉट पे जॅकपॉट लवकरच प्रदर्शित

जॅकपॉट पे जॅकपॉट लवकरच प्रदर्शित

वेबदुनिया

PR
सिनेमा इंडिया १८ मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली जॅकपॉट पे जॅकपॉट हा पहिला चित्रपट तयार होत असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन दिल्ली रंगमंचाचे प्रसिद्ध कलाकार दीपक ओचाने यांनी केले आहे. त्यामुळे हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

webdunia
PR
दीपक मोचाने थिएटर आणि मीडिया क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून सक्रिय आहेत. त्याने ब-याच अभिनेत्यासह सतीश कौशिक, अनिल चौदार, आनंद वर्धन यासारख्या आघाडीच्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. तसेच सतीश कौशिकसह अन्नू कपूर, अनुपम खेर, पंकज कपूर, शाहरुख खान, ओम पुरी यांच्यासारख्या कलाकारांसोबत सहदिग्दर्शकांची कामे केली आहेत.

याबरोबरच नाटक, रेडिओ, टीव्ही मालिकांसाठीही दिग्दर्शनाचे काम केले आहे. नैनज्योती, सावित्री, कुमारसंभव, आंसू, छाया आदी डीडीवर प्रसारित होणा-या मालिकांपैकी प्रमुख मालिका आहेत. याबरोबरच ढाई अक्षर प्रेम के, खजाना, बिवियों का मदरसा, सूर्य की अंतिम किरण आदी नाटकांचेही दिग्दर्शन केले आहे. सूर्य की अंतिम किरण या नाटकाचे २००२ मध्ये संयुक्त अमेरिका आणि कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय मंचावर फार कौतुक झाले होते.

webdunia
PR
जॅकपॉट पे जॅकपॉट या चित्रपटासाठी संगीत आणि गीतरचना प्रसिद्ध कलाकारांची आहे. त्यामध्ये सारेगामापाचे विजेते देबोजित सिंह, पंजाबचे प्रसिद्ध गायक प्रतीहरपालसिंह आणि अमेरिकेची गायिका अनिता लार्चे यांचा आवाज आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सिंगापूर, अ‍ॅमस्टरडॅम, कसोली आणि दिल्लीच्या आघाडीच्या बार आणि रेस्टॉरंटमध्ये झाली.

विशेष म्हणजे या चित्रपटाशी संबंधित सर्व कलाकार दिल्लीशी संबंधित आहेत. तसेच संपादक, तंत्रज्ञही दिल्लीचेच आहेत. त्यामुळे मुंबईप्रमाणेच दिल्लीतही फिल्मी जगत उभे करण्याची कल्पना पुढे आली. यात दीपक ओचाने आपला पहिला चित्रपट तयार करून दिल्लीत कमाल दाखवू शकतात.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi