Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रा वन विरुद्ध सुपरहीरो जी.वन

रा वन विरुद्ध सुपरहीरो जी.वन

वेबदुनिया

, शुक्रवार, 30 सप्टेंबर 2011 (12:45 IST)
बॅनर : रेड चिलीज एंटरटेनमेंट, इरोज एंटरटेनमें
निर्माता : गौरी खा
दिग्दर्शक : अनुभव सिन्हा
संगीत : विशाल-शेख
कलाकार : शाहरुख खान, करीना कपूर, अर्जुन रामपाल, मास्टर अरमान वर्मा, शहाना गोस्वामी, टॉम वू, दलीप ताहिल, सुरेश मेनन, सतीश शाह, संजय दत्त आणि प्रियंका चोप्रा (पाहुणी कलाकार)
रिलीज डेट : 26 ऑक्टोबर 2011
PR


शेखर सुब्रमण्यम (शाहरुख खान) एक गेम डिझाइनर आहे, ज्याने आजपर्यंत एकही यशस्वी व्हिडिओ गेम तयार केलेला नसतो. शेखरला मौजमजा करणे फार पसंत आहे, पण तो आपला जास्त वेळ कुटुंबासोबत न घालवत डिझाइन लेबमध्ये घालवतो.

webdunia
WD


दक्षिण भारतीय शेखरच्या बायकोचे नाव आहे सोनिया (करीना कपूर), जी एक पंजाबी मुलगी आहे. पंजाबी बायांप्रमाणे तिला तिचे जीवन चांगल्या प्रकारे जगायचे असते. ती कुठल्याही अडचणींना मात देऊ शकते शिवाय मॉडर्न टेक्नॉलॉजीला.

webdunia
WD


बिचारा शेखर आपल्या मुलाला खूश ठेवण्यासाठी प्रत्येक युक्तीचा वापर करतो, पण सर्वकाही बेकार जात. या दरम्यान शेखरने डिझाइन केलेला एग गेम सफल होतो. पूर्ण परिवार या गेमला बघण्यासाठी एकत्र झाला असतो. गेमच्यामध्ये हार्ड ड्राइव्ह क्रॅश होते आणि सुब्रमण्यम कुटुंबावर तूफान येतो. जो गेम त्यांनी खेळण्यासाठी डिझाइन केला होता तोच गेम आता त्यांच्याशी खेळायला लागतो.

webdunia
WD


चित्रपटात जी. वन (द गुड वन) नावाचा सुपरहीरो असतो. जी. वन विजेने तयार झाला असतो आणि त्यात रक्षा करणारा प्रोग्रॅम फीड आहे. तो उडू शकतो, बरीच भाषा बोलू शकतो आणि बऱ्याच वस्तूंना एकाच वेळेस नियंत्रित करू शकतो. त्याची शक्ती हार्ट (हर्टज अॅमप्लिफाइंग रेसोनेंस ट्रांसमीटर)मध्ये आहे. सुब्रमण्यम फॅमिली आणि जी. वनमध्ये काय संबंध आहे? हा जी. वन कोण आहे? ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला रा वनमध्ये मिळतील.

दिग्दर्शकाबद्दल :
अनुभव सिन्हा स्वत:ला फारच भाग्यशाली समजू शकतात, कारण एकही सुपरहिट चित्रपट न देता त्यांना बॉलीवूडचे सर्वात महागडे चित्रपट ‘रा. वन’ ला निर्देशन करण्याचा मोका मिळाला आहे. रा. वनच्या आधी त्यांनी तुम बीन (2001), आपको पहले भी कहीं देखा है (2003), दस (2005), तथास्तू (2006) आणि कॅश (2007) सारखे चित्रपटांचे निर्देशन केले आहे. मागील चार-पाच वर्षांपासून ते रा. वनमध्ये व्यस्त आहे. अनुभवला निपुण तकनीशियन मानले जाते, म्हणूनच त्यांच्या या गुणाला बघून त्यांना रा. वन सारखे हाय-फाय चित्रपट निर्देशित करण्याचा मोका मिळाला. त्याच्या या चित्रपटावर अब्ज लोकांचा डोळा लागलेला आहे.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi