Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘मर्दानी’ यशराजचा पहिला ‘अँडल्ट’ सिने'मा

‘मर्दानी’ यशराजचा पहिला ‘अँडल्ट’ सिने'मा
, शुक्रवार, 8 ऑगस्ट 2014 (16:39 IST)
बॅनर : यश राज फिल्म्स
निर्माता : आदित्य चोपड़ा
निर्देशक : प्रदीप सरकार
संगीत : सलीम-सुलैमान
कलाकार : रानी मुखर्जी, जीशु सेनगुप्ता, ताहिर राज भसीन
रिलीज डेट : 22 ऑगस्ट 
 
राणी मुखर्जीचा आगामी सिनेमा ‘मर्दानी’ लवकरच प्रेक्षकांच्या समोर येण्याच्या तयारीत आहे. या सिनेमाला नुकतंच अँडल्ट सर्टिफिकेट देण्यात आलंय. ‘मर्दानी’ हा यशराज फिल्म्सचा अँडल्ट सर्टिफिकेट मिळवणारा पहिला सिनेमा ठरलाय. या सिनेमा चाइल्ड सेक्स, ट्रॅफिकिंग आणि वेश्यावृत्तीसारख्या समाज विघातक गोष्टींभोवती फिरतो. या समाज विघातक गोष्टींशी या सिनेमात राणी लढा देताना दिसणार आहे.  
webdunia
पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणारी राणी एका ‘डॅशिंग’ अवतारात या सिनेमात दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अँडल्ट सर्टिफिकेट देण्यात आलेल्या या सिनेमात असे काही सीन्स होते ज्यावर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतला होता. त्यानंतर काही सीन्स आणि डायलॉग्स या सिनेमातून हटवण्यात आले. 
webdunia
नुकतीच विवाह बंधनात अडकलेली राणी मुखर्जी या सिनेमात पोलीस इन्स्पेक्टर शिवानी रॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात एक माफिया एका मुलीचं अपहरण करतो. तिच्या सोडवणुकीसाठी शिवानी निर्भय होऊन माफियांशी लढताना या सिनेमात दिसतेय. या लढाईत शिवानीचं जीवन पूर्ण बदलून जातं. 
 
प्रदीप सरकार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. हा सिनेमा येत्या 23 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi