दिग्दर्शक : विक्रम के. कुमार संगीत : शंकर-अहसान लॉयकलाकार : आर. माधवन, नीतू चन्द्रा, सचिन खेडेकर, मुरली शर्मा, पूनम ढिल्लो'13
बी' एक मनोरंजक चित्रपट आहे. तेराव्या मजल्यावरच्या घराचा हा क्रमांक आहे. या नव्या घरात मनोहर (आर. माधवन) कुटुंबियांसह रहायला येतो. पहिल्या दिवशी घरातल्या महिला 'सब खैरीयत' नावाचा टिव्ही शो पहात असतात. त्यांना हा कार्यक्रम खूप आवडतो. हा शो त्यांना घरच्यासारखाच वाटतो. कारण या शोमधील एक कुटुंब त्यांच्यासारखेच नव्या जागेत रहायला जाते. पण हद्द म्हणजे शोमधील कुटुंबियांच्या बाबतीत जे घडते, ते याही कुटुंबाच्या बाबतीतही घडते. मनोहर कुटुंबियांना फार मजा वाटते. ते याचा आनंद लुटतात. पण या टिव्ही शोमधील कुटुंबियांच्या बाबतीत वाईट घडू लागते, त्यावेळी मात्र मनोहर कुटुंबिय चिंतेत सापडते.
मनोहर कुटुंबियांच्या बाबतीतही तसेच घडते काय?
असे का होत असेल?
यामागे कोण असेल?
हे रहस्य उलगडण्यासाठी 13 बी हा चित्रपट पहायला पाहिजे.