Article Film Preview Marathi 2008 %e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b2 %e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96 %e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%9f 108010200008_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

2008 मधील प्रमुख चित्रपट

2008 मधील प्रमुख चित्रपट
IFMIFM
या वर्षांत गतवर्षासारखे बडे चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे निदान आतातरी संकेत नाही. कारण ज्या बड्या चित्रपटांचे काम सुरू आहे, ते नेमके प्रदर्शित कधी होतील ते सांगता येत नाही. कदाचित या वर्षाच्या उत्तरार्धात हे चित्रपट येऊ शकतात. पण ज्या चित्रपटांची माहिती मिळाली आहे, ती मांडायचा हा प्रयत्न.

गेल्या वर्षात ह्रतिक रोशनचा एकही चित्रपट आला नव्हता. आता या वर्षी जानेवारीतच ह्रतिक व ऐश्वर्या राय अभिनित व आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित जोधा अकबर हा बड्या बॅनरचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अजय देवगणचे अस्तित्व मागच्या वर्षी फारसे जाणवले नाही. या वर्षी संडे व हल्ला बोल हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हल्ला बोलचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांचे आहे. या दोघांची अद्याप यशस्वी न ठरलेली जोडी या चित्रपटाने तरी हीट ठरेल अशी अपेक्षा. अमिर पाठोपाठ अजयही दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरला आहे. 'यू मी और हम' या त्याच्या चित्रपटात त्याची पत्नी काजोलही आहे. बघूया अजय दिग्दर्शक म्हणून अमिरप्रमाणेच यशस्वी ठरतो का?

यशराज फिल्म्सचा या वर्षी 'टशन' हा एकमेव चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सैफ अली खान, अक्षय कुमार, करीना कपूर व अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटापासून मोठ्या अपेक्षा आहेत. याशिवाय याच बॅनरखाली दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद रणबीर कपूर, बिपाशा बासू व दीपिका पदुकोण एक चित्रपट बनविणार आहे. पण हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता कमी आहे.

webdunia
IFMIFM
खान त्रिमूर्तीत किंग खान सध्या बेकार आहे. सध्या त्याच्या एकही चित्रपटाचे शूटींग सुरू नाहीये. पम करण जोहर त्याला घेऊन माय नेम इज खान हा चित्रपट सुरू करणार आहे. त्यात काजोलही आहे. पण हा चित्रपटही या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता कमी आहे. भूतनाथ या चित्रपटात शाहरूख पाहुणा कलाकार म्हणून दिसेल.

सलमान तीन चित्रपटांमधून रसिकांसमोर येत आहे. 'गॉड तुस्सी ग्रेट हो' या रेंगाळलेल्या चित्रपटातून प्रियंका चोप्रा व अमिताभ बच्चन यांच्यासोबत तो पडद्यावर झळकेल. याशिवाय त्याला घेऊन सुभाष घई 'युवराज' बनवत आहेत. बोनी कपूर सलमानला घेऊन 'वॉंटेडः डेड ऑर अलाईव्ह' हा चित्रपट करत आहेत.

अमिर खान 'गझनी' या दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसेल. यात त्याच्याबरोबर जिया खान असेल. या चित्रपटासाठी अमिर तगडा दिसणार आहे. याशिवाय अमिर त्याच्या बॅनरखाली एखादा चित्रपट बनविण्याची शक्यता आहे. २००७ मध्ये अगीत पोळलेला रामगोपाल वर्मा या वर्षी 'सरकार राज' घेऊन येतो आहे. बच्चन कुटुंबिय यात दिसतील. सरकारचा हा सीक्वल असेल.

webdunia
IFMIFM
अभिषेक बच्चन 'सरकारराज' शिवाय द्रोण, दिल्ली ६ या चित्रपटातून रसिकांसमोर येणार आहे. 'सिंह इज किंग भी' हाही या वर्षातील एक महत्त्वाचा चित्रपट असेल. अक्षय कुमार व कैतरीना कैफ यात आहेत. पंधरा ऑगस्टपर्यंत तो प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. रवी चोप्राच्या भूतनाथमध्ये अमिताभ व शाहरूख खान आहेत. हरमन बावेजाचा लव्हस्टोरी २०५० याचीही चर्चा आहे. राकेश रोशन निर्मित क्रेझी ४, हेराफेरी ४, हिमेश रेशमियाचा कर्ज, अब्बास मस्तानचा रेस, संजय गुप्ताचा अलिबाग व वूडस्टॉक व्हिला आणि मधुर भांडारकरचा 'फॅशन' हे या वर्षातील बहुचर्चित चित्रपट आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi