Article Film Preview Marathi 2013 %e0%a4%ac%e0%a5%89%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a5%82%e0%a4%a1 %e0%a4%86%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80 %e0%a4%86%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3 113010800005_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

2013 बॉलीवूड आगामी आकर्षण!

बॉलीवूड

नव्या वर्षात अनेक ‍चर्चित चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटांची ही थोडक्यात माहिती....

धूम-3

IFM

'धूम' आणि 'धूम-2'च्या यशानंतर आता 'धूम-3' येत आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात आमीर खान चोराच्या भूमिकेत आहे. यापूर्वी अशा भूमिका जॉन अब्राहम आणि हृतिक रोशनने केल्या होत्या. 'धूम-3'मध्ये अभिषेक बच्चन आणि कॅटरिना कैफ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.


बेशर

webdunia

IFM

'रॉकस्टार' आणि 'बर्फी'च्या यशानंतर आता रणबीर कपूर 'बेशरम' बूनन पडद्यावर येत आहे. त्याच्याबरोबर असणार आहे पल्लवी शारदा ही नवी नायिका. पल्लपवी यापूर्वी 'लव्ह ब्रेकअप्स जिंगदगी'मध्ये होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'दबंग'चा दिग्दर्शक अभिनव कश्यक करणार आहे.


भाग मिल्खा भा

webdunia
IFM


प्रख्‍यात अ‍ॅथलेट मिल्खा सिंग यंच्या जीवनावरील या चित्रपटात फरहान अख्तरने मिल्खा यंची भूमिका केली आहे. हुबेहूब मिल्खाच वाटावा असे एकंदरीत त्याचे रूप आणि अभिनय यात पाहायला मिळेल. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या या चित्रपटाशी खुद्द 'द फ्लाईंग सिख' म्हणून ओळखले जाणारे मिल्खा सिंगही निगडित आहेत.

गुंड

webdunia

IFM

'मेरे ब्रदर की दुल्हन'चा दिग्दर्शक अली अब्बास जफर आता हा नवा चित्रपट घेऊन येत आहे. त्यात अर्जुन कपूर, रणवीर सिंह आणि प्रियंका चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत, काळ्या बाजारातील माफियांच्या कथानकावर आधारित हा चित्रपट आहे.

फटा पोस्टर निकला हिरो

webdunia
PR


राजकुमार संतोषी (घायल, दामिनी फेम) आता 2009च्या अजब प्रेम की गजब कहानी नंतर पुन्हा एखदा या चित्रपटाद्वार समोर येत आहे. त्याच्या या चित्रपटात शाहिद कपूर आणि इलियाना डिक्रुझ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हिरो हिरालाल या चित्रपटातील नसिरूद्दीन शाह यांच्या प्रसिद्ध संवदाचे शीर्षक या चित्रपटाला दिले आहे.

वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई-2

webdunia
PR


याच नावाच्या जुन्या चित्रपटाला चांगले यश मिळाल्यावर एकता कपूरने हौसेने त्याचा हा सिक्वेल तयार केला आहे. यात अक्षयकुमारने अजय देवगणाची जागा घेतली आहे. सोनाक्षी सिन्हा यात वेगळ्या भूमिकेत दिसून येईल. (तिने मंदाकिनीची भूमिका केली आहे म्हणे) इम्रान खाननेही (हाश्मी नव्हे) या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली आहे.

चेन्नई एक्सप्रेस

webdunia
IFM


'हिट मशीन' म्हणून ओळखल्या जाणार्‍या रोहित शेट्टीच्या या चित्रपटाकडून शाहरुख खानला बर्‍याच अपेक्षा आहेत. यात त्याच्याबरोबर दीपिका पादुकोण आहे. सहा वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. शाहरुखने यात अ‍ॅक्शन आणि कॉमेडी दोन्ही केली आहे. मुंबईतून मालेश्वरमला जात असलेल्या एका तरुणाची कथा यात आहे.

हिंमतवाल

webdunia

IFM

1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या जितेंद्र व श्रीदेवीच्य 'हिंमतवाला'चा हा रिमेक आहे. यात अजय देवगण जितेंद्रच्या भूमिकेत दिसेल. हा चित्रपट अगदीच जुन्या चित्रपटासारखा असणार नसून त्यात काही नावीन्यही ‍असेल, असे दिग्दर्शक साजीद खानचे म्हणणे आहे. चित्रपटात श्रीदेवीची भूमिका दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना करणार आहे.

जंजी

webdunia

PR

प्रकाश मेहरांच्य 'जंजीर' या चित्रपटाचा हा रिमेक आहे. जुन्या चित्रपटाने अमिताभ बच्चनची कारकीर्द घडली. आता नव्या चित्रपटाद्वारे आपली कारकीर्द घडविण्यासाठी चिरंजीवीचा चिरंजीव रामचरण तेजा सज्ज झाला आहे. त्याच्याबरोबर या चित्रपटात संजय दत्त आणि प्रियंका चोप्रा आहे.

रेस-2

webdunia

PR

अब्बास-मस्तान यांचा नेहमीच सस्पेन्स-थ्रिलरवर जोर असतो. त्यांच्या 'रेस'च्या यशानंतर आता हा 'रेस-2' पडद्यावर येणार आहे. त्यात सैफ अली खान, जॉश्र अब्राहम, दीपिका पादुकोण, जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर अशी बरीच कलाकार मंडळी आहेत. 25 जानेवरीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

मर्डर 3

webdunia

PR

मर्डर 3 फेब्रुवारीत रिलीज होणार आहे. यंदा इमरान हाशमी यात नसल्याने त्याचे चाहते थोडे निराश होणार आहे. विशेष फिल्म्स यावेळेस रणदीप हुडावर मेहरबान असून तो यात हीरोचा रोल करणार आहे. अदिति राव हैदरी आणि सारा लॉरेन त्याच्या हिरॉइन्स असणार आहे. चित्रपटाशी निगडीत सूत्रांचे म्हणणे आहे की मर्डर 3मध्ये हॉट सीन्सची मात्रा कमी करण्यात आली आहे, तरीसुद्धा काही दृश्य प्रेक्षकांना बघायला मिळतील.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi