'
कुहू' उर्फ पगली (मल्लिका शेरावत) '
कुहू' उर्फ पगली म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर 'कठिण' किंवा 'अशक्य' मुलगी आहे. ती काय करेल खुद्द तिलाही सांगता यायचे नाही. तिच्या व्यकिगत जीवनात खूप अडचणी आहेत. त्यामुळे आपल्या जीवनात आलेल्या व्यक्तिला त्या जाणवायला हव्यात हा तिचा अट्टाहास आहे. म्हणूनच ती अशा एका तरूणाच्या शोधात आहे, जो आपल्या प्रेमात पडेल, पण त्याच्या आयुष्यात वादळ निर्माण करण्याची तिची इच्छा आहे. पगलीच्या आत खोडकरपणाही दडला आहे. तो कधी बाहेर येईल सांगता यायचे नाही. त्यावेळी समोरच्याची पळता भुई थोडी होते. एवढे मात्र नक्की. कबीर उर्फ अगली (रणवीर शौरी)
कबीर अत्यंत बोअर माणूस आहे. इंजिनियरींगच्या पाट्या तो दहा वर्षे टाकत बसला आहे. आपल्याला एखादी गर्लफ्रेंड असावी ही त्याची 'तमन्ना' आहे. थंडीच्या दिवसात मुंबईच्या सीएसटी स्टेशनवर त्याची भेट पगलीशी होते. तिच्या संपर्कात आल्यानंतर त्याला कधी विचारही केला नसेल अशी कामे करावी लागतात. अखेर तो तिच्यापासून स्वतःची सुटका करू इच्छितो. पण ते करता करता तो तिच्या प्रेमात पडतो. अशा अवस्थेत पुढे काय होते? त्यासाठी पहा 'अगली और पगली'.