सध्या राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. हा संपूर्ण चित्रपट एकट्या राणीच्या खांद्यावर आहे. या चित्रपटात राणीने मिनाक्षी देशपांडे नावाच्या मराठमोळ्या मुलीची भूमिके साकारली आहे.
देशपांडे या ब्राह्मण कुटुंबातील मिनाक्षी थोरली मुली आहे. मुलगी वयात आल्यामुळे तिचे आई वडील (निर्मिती सावंत आणि सतिश आळेकर) तिच्यासाठी सुयोग्य,सुंदर आणि स्वजातीय मुलाच्या शोधात आहे. मिनाक्षीला चित्रपटांचे प्रचंड वेड आहहे. ती आपल्याच जगात वावरत असते. आई वडिलांचे सुरु असलेले वर संशोधन, मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम, एवढे सगळे होत असताना मिनाक्षीचे मात्र कुण्या दुसर्याच मुलावर प्रेम आहे. मिनाक्षी एकतर्फी प्रेम करत असलेला मुलाचे नाव सूर्या असून तो कलाकार आहे. तो तामिळ आहे. ही भूमिका दाक्षिणात्या अभिनेता पृथ्वीराजने साकारली आहे. आता मिनाक्षीचे आईवडील तिला हव्या असलेल्या मुलाबरोबर तिचे लग्न लावून देणार का? सुर्याला मिनाक्षीचे त्याच्यावर असलेले प्रेम कळणार ? हे आपल्याला विनोदी पद्धतीने या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
या सिनेमात राणीचे तीन डान्स नंबर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात राणी लावणी, बेली डान्स आणि साऊथ स्टाईल डान्सवर थिरकली आहे. या सिनेमात राणीबरोबर पृथ्वीराज, निर्मिती सावंत, सतीश आळेकर, ज्योती सुभाष, सुबोध भावे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 12 ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.